मोर पक्षी माहिती मराठी | peacock information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मोर पक्षी बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही मोर पक्षी माहिती मराठी ,peacock information in marathi , मोर पक्षी निबंध मराठी , peacock in marathi essay , peacock mahiti in marathi , peacock gender in marathi , peacock essay in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

मोर पक्षी माहिती मराठी | peacock information in marathi

मोर पक्षी माहिती मराठी | peacock information in marathi

मोरा विषयी १० ओळी मराठी मध्ये | peacock information in marathi 10 lines

  1. मोर हा भारताचं राष्ट्रीय पक्षी आहे.
  2. मोर हा सौंदर्याचे आणि आनंदाचे प्रतीक आहे.
  3. मोर हा सरस्वती देवी आणि कार्तिक स्वामींचे वाहन आहेत.
  4. मोराचा पिसारा फारच रंगीबेरंगी आणि मनमोहक असतो.
  5. मोर हा नर असून त्याच्या मादीला लांडोर असे म्हणतात.
  6. मोर ८ फुटापर्यंत उंच उडू शकतो, तसेच त्याचे वजन ४-५ किलो इतके असते.
  7. मोरांचे पंख पुस्तकामध्ये ठेवली जातात, तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो.
  8. पावसाची चाहूल लागताच मोर थुई थुई नाचू लागतो.
  9. “नाचरे मोरा आंब्याच्या वनात , नाच रे मोरा नाच ” हे मोराचे गाणे प्रसिद्ध आहे.
  10. मोराचे प्रामुख्याने आवडते अन्न उंदीर , साप , किडे , पाली हे आहेत.

मोर पक्षी माहिती मराठी | peacock information in marathi

मोराचे सुंदर हिरवे निळे पंख त्याच्या डोक्यावर असलेला सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मोराला पक्षांच्या राजा म्हटले जाते. मोर कुकुटवर्गीय पक्षी असून त्याचे वैज्ञानिक नाव पावो क्रिस्टेटेस आहे. इंग्रजीत त्याला पीकॉक म्हटलं जातं, तर संस्कृतमध्ये मयूर नावाने तो ओळखला जातो.

देशाच्या प्रत्येक भागात सापडणारा आपण सर्वाना माहिती असलेला आणि भारतीय संस्कृतीचा असल्याने ती आणि सौंदर्याचे प्रतिक असल्याने 26 जानेवारी 1963 रोजी देशाच्या राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे भारताप्रमाणेच म्यानमार व श्रीलंका देशाच्या राष्ट्रीय पक्षी देखील मोरच आहे. विशेष म्हणजे मोराचे संदर्भ प्राचीन काळापासून पहावयास मिळतात.

हिंदू देवता श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोरपीस विराजमान आहे. तर सरस्वती देवी व कार्तिक याचे वाहन देखील मोराचं आहे. सम्राट अशोक व मौर्य राजांच्या नाण्यावर मोर कोरलेले आढळतात. खुद्द शहाजहान बादशहा मयूर सिंहासनावर बसत असे. मोर हा मूळचा भारतीय आहे.

अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशात नेले व त्यानंतर विविध देशात मोराच्या विविध प्रजाती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मोराचे वास्तव सामान्यपणे दाट झुडपांमध्ये आणि विशेषतः नदी व ओढा यांच्या जवळपास असते. जंगलामध्ये एका मोराबरोबर विशेषतः २ ते ३ लांडोर आढळतात. दिवसभर खाद्य शोधून झाल्यावर रात्रीच्या वेळी ते एखाद्या झाडावर विश्रांती करतात.

पहिल्या पाऊसाची चाहूल लागतातच मोर पिसारा फुलवून नाचत असतो. पावसाळ्यात आपण अनेक ठिकाणी मोर नाचताना पहिलाच असेल. तसेच लांडोरला आकर्षित करण्यासाठी मोर त्याचा समोर पिसारा फुलवून दाखवतो.

वाघ , कोल्हा , रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत. हे प्राणी शिकारीसाठी जवळपास असल्यास मोर इतर प्राणी पक्षांना आपल्या आवाजाने ओरडून सावध करतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी उंचच उंच झाडावर जाऊन बसतात. मोर हा एक बहुभक्षी पक्षी असून तो साप , उंदीर , सरडे , पाली , किडे खातो.

त्याचप्रमाणे मोराला धान्य सुद्धा खातो. अन्नाच्या शोधामध्ये बहुतेक वेळेचं मोर मानवी वस्तीमध्ये सुद्धा आढळून येतो. साधारण मोर २५-३० वर्षे आयुष्य जगतो. त्याचप्रमाणे मोर ८-१५ फूट उंच उडू शकतो आणि ३० फूट एवढे अंतर तो कापू शकतो . मोराचा वेग 16 कि मी प्रति तास इतका आहे.

मोर चमकदार हिरवट निळ्या रंगाचे असतात. त्यांना लांब अशी सुंदर मान असते. त्याच्या लांब पिसावर चंद्रासारखे ठिपके असून ते हिरव्या , निळ्या , पिवळ्या आणि सोनेरी रंगछटांचे असतात. त्यांना लांब पाय आणि तुरा असतो आणि त्यांची मान गडद निळ्या रंगाची असते. नराला शेपटी भोवती पिसारा असतो. त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून त्या पासून तयार झालेला पिसारा ९०-१२० सिमी लांबीचा असतो. त्यात सुमारे २०० पिसे असतात.

बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून त्याच्या मध्यभागी जांभळट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असतो. त्याभोवती निळ्या रंगाने वेढलेलं विविध रंगाचे वलय असते. पाय बळकट असून त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडिका असते. मोराचे एकमेकांचे भांडण झाल्यावर ते याच शुंडिकेने एकमेकांवर हल्ला करीत असतो.

मिलन काळानंतर मोराच्या शेपटी वरील पिसे गळून पडतात. विशेषतः मोराचा नाचण्याचा कालावधी आणि पिसांची संख्या यावर लांडोर मोराची निवड करते. लांडोर अंडी घरट्यामध्ये न घालता जमिनीवर घालते.

एक वेळी ३-५ अंडी जमिनीवर घालते आणि २८-३० दिवसांनी अंड्यामधून पिल्लू बाहेर येते. मोराच्या मादीला लांडोर म्हटले जाते , हे लांडोर आकर्षक दिसत नाही कारण तिला मोराप्रमाणे पिसारा नसतो. ती आकाराने लहान असून एक तपकिरी रंगाची असते. तिच्याकडे रंगबेरंगी पिसे नसतात. तिचे पाय ओबड धोबड असून
कुरूप असतात. लांडोरीच्या डोक्यावर देखील नरा प्रमाणे तुरा असतो.

चोचीपासून शेपटीपर्यंत त्याची लांबी १००-१२० से. मी. पर्यंत असते. मोराचे वजन साधारण ४-५ किलो असते. लांडोरची लांबी ९५ से. मी. आणि वजन ४ किलो असते.

मोर ज्या प्रकारे ओरडतो किंवा आवाज करतो त्याला म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू…म्यूॅंहू असे म्हणतात. मोराच्या आवाजाला केकारव असे म्हटले जाते. अनेक काळापासून मोराच्या पंखांचा वापर शाहीचे मजकूर लिहण्यासाठी, मुकुट , शोभेच्या वस्तू , देखावा या मध्ये वापरलं जातो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मोर पक्षी माहिती मराठी ,peacock information in marathi , मोर पक्षी निबंध मराठी , peacock in marathi essay , peacock mahiti in marathi , peacock gender in marathi , peacock essay in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment