भगत सिंग मराठी माहिती | bhagat singh information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये भगत सिंग यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही bhagat singh information in marathi , भगत सिंग माहिती मराठी , bhagat singh marathi mahiti , bhagat singh punyatithi in marathi , history of bhagat singh in marathi   याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

भगत सिंग मराठी माहिती | bhagat singh information in marathi

भगत सिंग मराठी माहिती | bhagat singh information in marathi

सरदार भगतसिंग यांचा जन्म पंजाब मधील बंगा गावात २६ सप्टेंबर १९०७ रोजी एका सरदार कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग होते आणि आईचे नाव विद्यावती असे होते. ज्या घरात भगतसिंगचा जन्म झाला, त्याच घरात देशभक्ती जणूकाही निखार्‍यासारखी फुललेली होती. कदाचित म्हणूनच वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी भगतसिंग हे आंदोलनात सामील झाले.

भगत सिंग यांचे शालेय शिक्षण राष्ट्रीय विद्यालयातून झाल्यानंतर लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १९२० साली गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली. त्यातही या लहानग्या देशभक्तांनीं सहभाग घेतला. पण या चळवळीचे रूप १९२२ साली हिंसेकडे वळलं. तेव्हा गांधीजींनी ही चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला.

रशियन राज्यक्रांती आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानाने भारावलेला भगतसिंग हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या चंद्रशेखर आझाद यांनी स्थापलेल्या संघटनेत काम करू लागला. या संघटनेच्या क्रांतिकारकाने त्या काळात अनेक धाडसी कृत्य केली होती. जे पाहून इंग्रजांच्या छाताडात जणू धडकी भरली होती.

त्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारला चांगला धडा देण्याची योजना आखली लाला लजपतराय सारख्या वयोवृत्त नेत्यावर लाठी मार करून त्यांना ठार मारणाऱ्या स्कॉटला मारण्याची योजना आखली.

भगतसिंग यांनी राजगुरूच्या साहाय्याने ही योजना पार पाडली. पण थोडा घोळ झाला स्कॉट ऐवजी सौडर्स नावाचा अधिकारी मारला गेला. यानंतर भगतसिंग वेषांतर करून शिखांची डोक्यावरची पगडी उतरवून, युरोपियन पद्धतीचा पोशाख परिधान केला. एवढंच नव्हे तर क्रांतिकारक भगवती चरणची पत्नी दुर्गा भाभी भगतसिंगची पत्नी झाली आणि राजगुरू त्यांचा नोकर बनला. हे सारे जण लाहोर स्टेशनवरून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना तेथून एका रेल्वेतून पसार झाले.

दरम्यानच्या काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळीला हानिकारक ठरेल असे कायदे संसदेने संमत केले होते. याचा निषेध म्हणून बहिऱ्या इंग्रज सरकारपर्यंत आणि समाजापर्यंत आपले म्हणणे पोचवावं या हेतून संसदेत निर्जन ठिकाणी यांनी बॉम्ब हल्ला केला आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीनही झाले. तुरुंगातही आपला लढा आणि इन्कलाब चा नारा ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिले. पण तुरुंगातील भारतीय आणि इंग्रज कैद्यांमध्ये होणाऱ्या भेदभावावर त्यांनी आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

यात एका क्रांतिकारकाचा मृत्यू झाला. तेव्हा कुठे इंग्रजांनी भगतसिंग आणि सहकाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. या सर्वांवर खटला चालवण्यात आला. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचारही झाले आणि अखेर न्यायालयाने २४ मार्च १९३१ रोजी त्यांना फाशी देण्याचा जाहीर केलं. तथापि २३ मार्चलाच लाहोर शहरात हजारो लोक जमल्यानं इंग्रज घाबरले आणि एक दिवस अगोदरच भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्चला संध्याकाळी ७ वाजून 33 मिनिटांनी त्यांनी फासावर चढवले.

हे तिघेही हसत हसत इन्कलाब जिंदाबाद या घोषणा देत फासावर गेले. अश्याप्रकारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू देशासाठी शहीद झाले.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला bhagat singh information in marathi , भगत सिंग माहिती मराठी , bhagat singh marathi mahiti , bhagat singh punyatithi in marathi , history of bhagat singh in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “भगत सिंग मराठी माहिती | bhagat singh information in marathi”

Leave a Comment