मंगलाष्टक मराठी | mangalashtak marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी मंगलाष्टक विषयी माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही मंगलाष्टक मराठी ( mangalashtak marathi ) , mangalashtak marathi lyrics , tulsi vivah mangalashtak marathi , mangalashtak marathi pdf , marathi mangalashtak list , wedding mangalashtak in marathi , मंगलाष्टक मराठी lyrics लग्नामध्ये , तुलसी विवाह साठी वापरू शकता.

मंगलाष्टक मराठी | mangalashtak marathi

खालील प्रमाणे मराठी मंगलाष्टके तुम्ही लग्नामध्ये , तुलसी विवाह साठी वाचू शकता.

स्वस्ति श्री गणनायकं ‘गजमुख मोरेश्वरं सिद्धिदं ।।
बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं ॥
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विखेहरं ओझरं ॥
ग्रामे रांझण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम् ॥ [१]

गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका ॥
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता तथा गंडकी ॥
पूर्णा पूर्णजला समुद्रसरिता कुर्यात् सदा मंगलम् ॥ [२]

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा – धन्वतरिश्चंद्रमाः ॥
गाव: कामदुधाः सुरेश्वरगजो रंभादिदेवांगनाः ॥
अश्वः सप्तमुखोविषं हरिधनुं शंखोऽमृतं चांबुधे ॥
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलं ॥ [३]॥

औदार्ये इतरां तिघांस जगतीं जो जाहला आश्रम ||
दावी देऊनि धैर्य अज्ञ मनुजा सन्मार्ग तो अक्षय ॥
जो राजा जनकादिकां जनहितीं सद्बुद्धि दे निश्चल ||
गार्हस्थ्याश्रम तो तुम्हां वधुवरां देवो सदा मंगल || [४] ||

लाभो संतति संपदा बहु तुम्हां लाभोतही सद्गुण ।।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र धुरीण हॅचि कथिति कीर्ती करा उज्ज्वल ॥
साईस्थ्याश्रम हा तुम्हां वधुवरां देवो सदा मंगल || [५] ||

कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षः स्थले कौस्तुभं ।।
नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणं ॥
सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली ॥
गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलं ॥

माथां राखडि मूद फूल कुपरी मासे जलें आवळे ||
ताईता वरि मोर बोर जडिले गंगाजळीं गुफिले ॥
भांगी लालगुलाल कुंकमचिरी लेऊनि आल्या पहा ||
येवोनि वधुमंडपीं वधूवरां कुर्यात् सदा मंगलं ॥

प्रकाशी कांची अवंतिका मधुपुरी माया अयोध्यापुरी ।।
श्रीमद्वारवती सुपुण्य जनका विख्यात पृथ्वीवरी ॥
क्षेत्रीं धर्म परायण अनुपमें जे वर्णिले कौतुकें ॥
ते कल्याण वधुवरासि सुमती कुर्यात् सदा मंगलं

पातिव्रत्य धरून थोर मिळवी कीर्तीस तूं भूवरी ॥
सच्छीलें कृतिनेहि भूषित सदा दोही कुलातें करी ॥
धर्मन्यायपथा धरूनि जगतीं पावा महा गौरव ॥
लाधोनि पतिचे सुखा हरि कृपें तूं अष्टपुत्रा भव ॥

गोत्रें भिन्न परस्पराहूनि तशी कीं भिन्न ज्यांची कुळें ||
जीवें एकचि होति तीं वरवधू आजन्म ज्याच्यामुळे ||
तें ये ईशकृपें घडून सदनीं मांगल्य वैवाहिक ||
दांपत्या चिरनित्य शंकरकृपें कुर्यात् सदा मंगलम् ।।

शास्त्रीं आश्रम चार जे कथियले त्यांमाजि जो उत्तम । ॥
देतो स्वार्थ परार्थ जोडूनि नरा ऐसा गृहस्थाश्रम ।।
झालीं बद्ध तया विवाहविधिने स्वीकारुनी सौख्यदा ।।
मांगल्यप्रद ‘सावधान’ रथ त्यां कुर्यात् सदा मंगलम् ॥

मत्स्या पासूनि चारिते नरहरीपर्यंत झाले कृतीं ॥
त्रेत वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ।।
ऐसे हे अवतार सात मग तो द्वापारिचा आठवा ।।
श्रीकृष्ण कलिमाज बौद्ध नववा कलंकी पुढे दहावा ।।

मालाकार परस्परें कर गळां घालोनि गोपांगना ।।
गाती नाचति पाहती अवधिया एका जगज्जीवना ।।
सोन्याचे मणि ओविले भुजगुणी गोऱ्या शशांकानना ।।
पाचूचें पदक स्थळीं स्मर मनीं श्रीदेवकी नंदना ।।

मोठे दोंद कटीं फणींद्र बरवा भाळी शशी शोभतो ||
हस्तीं अंकुश लाडू पद्म परशू दंती हिरा झळकतो ॥
पायीं पैंजण घागरी रुणझुणी प्रेमें बरा नाचतो ॥
ऐसा देव गणेश तो वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥

आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा ।।
गृयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटातें घरा ।।
दृष्टादृष्ट वधूवरां न करता दोघें करावीं उभीं ॥
वाजंत्रें बहू गलबला न करणे कुर्यात सदा मंगलम् ॥

यं ब्रह्ला वरुणेंद्र रूद्र मरुतः स्तुन्वंति दिव्यै स्तवैः ।।
वैदेः सांग पदक्रमोपनिषदैर्गायंति यं सामगाः ॥
ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंति यं योगिनो ॥
यस्यांतं न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः ।।

या कुंदन्दु तुषारहारधवला या शुभ्र वस्त्रावृता ॥
या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना ।।
या ब्रह्राच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता ॥
सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् सदा मंगलं ॥

कंठस्थानिं विराजतो फणिवर शीर्षेच गंगा भली ॥
हस्तीं त्रिशुळादिकपाळ डमरू नेत्र तिजा प्रुस्थळीं ।।
वामांकीं गिरिनंदिनी कटितटे शार्दूल चर्मांबर ॥
शेषाद्री शिखरीं वसे निशिदिनीं त्या शंकरा वंदितों ॥।

श्रीरामा पुराषोत्तमा नरहरे नारायणा केशवा ॥
गोविंदा गरूडाध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा ॥
श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते ॥
वैकुंठाधिपते चराचरापते लक्ष्मीपते पाहि माम् ॥

आदौ देवकिदेवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं ॥
मायापूतनजीवितापहरणं. गोवर्धनोद्धारणम् ॥
कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुता पालनं ॥
एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्ण लीलामृतम् ॥

ज्याच्या मस्तकिं भव्य जटा मंडीतमुगुट तो ॥
मध्ये वेष्टित वल्कलें झळकती पीतांबर शोभतो ॥
आश्चर्या जन पावती बघुनियां मूर्ती बरी गोजिरी ॥
चारीवेद मुखीं सदैव बसती तो दत्त भूमीवरी ॥

भासे गूढ जसा परी नच तसा अभंगची बोलत ॥
सांगे सत्यव्रता जगदीशमता वेदांतची शोषित ॥
भावार्थी बरवा सदैव नमो जो इंद्रायनी विठ्ठला ॥
वाणी तोच नमो खचीत तुकया सर्वांगुणी चांगला ||

देवीं जो स्तविला जगीं प्रगटला बही जसा भासला ॥
वेदार्थों वदला वनीहि तपला शास्त्र कथी चांगला ॥
अठराहि वदला पुराण लीला बोधी स्वर्ये पांडवां ॥
तोचि व्यास खरा मनीं निट धरा दावो जना माधव ॥

द्वैताभ्यास नको उर्गे पढु नको दुष्टांसि बंदू नको ॥
शास्त्राभ्यास रखो श्रुति चुकुं नको, तीर्थासि निंदू नको।।
काळाचें भय मानसीं धरूं नको, ढोंगांस भुलू नको ॥
ज्याचीया स्मरण पतीत तरले, तो ईश सोडूं नको ॥

ज्याच्या मस्तकिं दीर्घ नूतन जटा फेटा दिसे टोप तो ॥
मध्यें वेष्टित वल्कलें झळकती दूजा म्हणे कोण तो ॥
आश्चर्या अति पावली बघुनियां तूणीर पाठीवरी ॥
राजीवाक्ष असा विलोकुनि वधु धावे जशी बावरी ॥

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मंगलाष्टक मराठी ( mangalashtak marathi ) , mangalashtak marathi lyrics , tulsi vivah mangalashtak marathi , mangalashtak marathi pdf , marathi mangalashtak list , wedding mangalashtak in marathi , मंगलाष्टक मराठी lyrics हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment