पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | pandit jawaharlal nehru information in marathi

 नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू माहिती, pandit jawaharlal nehru information in marathi , jawaharlal nehru essay in marathi , jawaharlal nehru biography in marathi , pandit jawaharlal nehru bhashan in marathi , chacha nehru speech in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

पंडित जवाहरलाल नेहरू | pandit jawaharlal nehru information in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला होता. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधान मंत्री होते. त्याचप्रमाणे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर असणारे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ १९४७ ते १९६४ म्हणजेच १७ वर्ष इतका होता. स्वतंत्र लढ्यातील नेहरू हे महत्वाचे नेते होते. स्वातंत्रानंतर सुद्धा देशाच्या राजकारणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांनाआधुनिक भारताचे निर्माते म्हटले जाते.

त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांचा जन्म एका गर्भ श्रीमंत घराण्यात झाला होता. त्यांचे वडील अलाहाबाद कोर्टात प्रसिद्ध वकील होते. त्यांचा घर कालव्या (कालव्याला हिंदीमध्ये नेहर म्हणतात) जवळ होते, म्हणून त्यांना लोकांनी नेहरू अशी उपाधी दिली. नेहरूंच्या पूर्वजांचे स्थलांतर काश्मीर मधून उत्तरप्रदेश येथे झाले होते , ते काश्मीरी पंडित होते. त्यांचे बाकीचे शालेय शिक्षण इंग्लंड येथील हॅरो स्कूल येथे झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण ( pandit jawaharlal nehru education )

त्यांचे बाकीचे शालेय शिक्षण इंग्लंड येथील हॅरो स्कूल येथे झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय , कॅब्रिज येथून १९१० पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इनर टेम्पल , लंडन येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

१९१२ साली त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. नंतर ते भारतात परतले आणि अलाहाबाद कोर्टात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. पण ते त्यांच्या वडिलांएवढे यशस्वी वकील नव्हते. कारण त्यांचे मन देशाच्या राजकारणामध्ये , आंदोलांमध्ये त्यांना जास्त रस होता.

अश्याप्रकारे त्यांनी हळू हळू राजकारणामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. १९१२ मध्ये त्यांनी बांकीपूर येथील काँग्रेसच्या सभेसाठी हजेरी लावली. नंतर १९१६ मध्ये कमला देवी यांच्याबरोबर लग्न केले आणि १९१७ मध्ये त्यांनी कमला देवी यांनी इंदिरा प्रियदर्शनी म्हणजेच इंदिरा गांधी यांना जन्म दिला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द

पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि गोपाळ कृष्णा गोखले यांच्या मताशी सहमत नव्हते. नेहरूंना पंतप्रधान बनवण्यामध्ये महात्मा गांधीजी यांचा मोलाचा वाटा होता. या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल तसेच राजेंद्र प्रसाद सुद्धा होते.

काँग्रेस मध्ये त्या वेळी २ गट निर्माण झाले होते. ज्यांचे नाव गरम दल आणि नरम दल असे होते. जवाहरलाल नेहरू यांना गरम दलाची मते पटत होती , तर त्यांच्या वडिलांना नरम दलाची बाजू उत्तम वाटत होती. नेहरूंचे असे म्हणणे होते की , आपण ब्रिटिश सरकार बरोबर असहकार करून , सर्व पदावरून राजीनामा दिला पाहिले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रवास

जवाहरलाल नेहरूंनी होम रुल चळवळ मधून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. त्यांच्यावर ऍनी बेसंट यांचा चांगला प्रभाव होता. भारताला स्वतंत्र देशाची मान्यता मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती, पण त्या वेळी काँग्रेस ची अशी कोणतीच मागणी नव्हती. जवाहरलाल नेहरू यांची होम रुल चळवळ साठी सचिव म्हणून निवड करण्यात आली होती.

नेहरूंच्या अधिपत्याखाली पूर्ण भारतामध्ये ए.आय.एम एस. (AIMS) , आय. आय. टी. (IIT), आय. आय. एम (IIM), इन. आय. टी. (NIT), सी. एस. आय. आर. (CSIR) या सारख्या जगविख्यात संस्थांची स्थापना झाली.

भारताच्या अणुप्रकल्पाचा काम सुद्धा वीजनिर्मितीसाठी सुरु झाले. १९६२ च्या युद्धांनंतर अणू प्रकल्पाचे होमी जहांगीर बाबा यांच्या नेतृत्वाखाली संरक्षणासाठी वापरण्यावर जास्त भर देण्यात आला.

जहावरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत होती. म्हणून त्यांना सर्व लहान मुले चाचा नेहरू म्हणून ओळखतात. त्याचबरोबर दरवर्षी १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये साक्षरता दर १४% होता. नेहरूंच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर १९५२ साली झालेल्या निवडणुकीत सर्व नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार होता.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू

अखेर जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यु २७ मे १९६४ रोजी झाला.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला  पंडित जवाहरलाल नेहरू माहिती, pandit jawaharlal nehru information in marathi , jawaharlal nehru essay in marathi , jawaharlal nehru biography in marathi , pandit jawaharlal nehru bhashan in marathi , chacha nehru speech in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

3 thoughts on “पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | pandit jawaharlal nehru information in marathi”

Leave a Comment