संत जनाबाई यांची माहिती | sant janabai information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये संत जनाबाई यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही संत जनाबाई यांची माहिती , sant janabai information in marathi ,संत जनाबाई निबंध ,संत जनाबाई माहिती याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

संत जनाबाई यांची माहिती | sant janabai information in marathi

संत जनाबाई जन्म

गोदावरी नदीच्या तीरावर स्तिथ गंगाखेड जिल्हा परभणी महाराष्ट्र येथे जनाबाईचा जन्म झाला होता. जनाबाईंच्या लहानपणी त्यांची आई वारली होती.

जनाबाई यांच्या आई आणि वडिलांचे नाव दमा आणि करुंड असे होते. त्यांच्या जन्म इ स १२६५ या साली झाला. 6 व्या वर्षी अनाथ झालेली जनाबाई यांना पंढरपूर येथे सोडून देण्यात आले. दामा शेट्टी नी ते लेकरू रडताना पाहवले नाही म्हणून त्यांनी घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. पुढे नामदेवांनी त्यांचा सांभाळ केला. ८५-९० वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले असे सांगितले जाते.

त्यांनी जवळपास सर्व संतांवर अभंग लिहिले, पण त्यांच्यावर कोणी अभंग लिहिलेले पाहण्यात आलेले नाही. नामदेवांना कडेवर खेलवल्याचा उल्लेख असलेले अभंग त्यांनी लिहिला. कारण नामदेवांच्या आधी त्या जन्माला आल्या आणि नामदेवाबरोबर त्या समर्पित झाल्या. 

जनी या शब्दाचा अर्थ म्हणजे स्त्रियांचा समूह. म्हणजेच जनी ही एक स्त्री नसून तिच्यामध्ये लाख स्त्रियांचे व्यक्तिमत्व सामाविष्ट झालेले आहे. जनाबाई अत्यंत लोकप्रिय अश्या संत होत्या. जनमानसात त्याचं चांगला ठसा उमटला होता.

जनाबाई वर इतक्या ओव्या लिहल्या गेल्यात जितक्या अन्य कोणत्याही संतावर लिहल्या गेलेल्या नाहीत. संत ज्या भागात किंवा प्रांतात जन्माला येतो त्या जवळील भागात त्या संतावर ओव्या किंवा अभंग लिहले जातात. पण जनाबाई अश्या संत आहेत ज्यांच्यावर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अभंग आणि ओव्या लिहल्या आहेत. 

याचाच अर्थ जनाबाई महाराष्ट्रामधील प्रत्येक स्त्री मध्ये आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री जनाबाई मध्ये आहे, असे म्हटले तर योग्य असेल. जनाबाई या महाराष्ट्रातील स्त्री चे प्रतीक आहे. तसेच त्या महाराष्ट्रातील स्त्रीचा मूर्तिमंत उदाहरण आहेत. 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पासून लता मंगेशकर यांच्या पर्यंत सर्वांनी त्यांचे अभंग आणि ओव्या गायल्या आहेत. 

संत जनाबाई यांचा जीवन प्रवास | sant janabai life

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचे एक गाव आहे. तेथे दमा या नावाचा एक शूद्र राहत असे. तो भागवत भक्त असून पंढरीची वारी अनेक वर्षे करीत असे. त्याची बायको करुंड ही पतीव्रता स्त्रिया असून पंढरपूरची यात्रा करते. या दाम्पत्याला एकही मुलबाळ नसल्याने ते मनातून दुःखी असत. एके दिवशी त्यांनी पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाला नवस केला आणि विठ्ठलाने ही दम्याची आणि उत्कट भक्ती पाहून त्याला दृष्टांत दिला.

जनाबाईंचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते. पांडुरंगाशी अगदी एकरूप होऊन गेले. एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. समोर पांडुरंग उभा असे पाहून ‘पांडुरंग-पांडुरंग’ असे ते नामस्मरण करू लागले. डोळे भरून पाहतात तो तेथे कोणीच दिसेना. पण पांडुरंगाने त्यांची आर्तता पाहून दम्याला सांगितले, “दमा तुझ्या कुळाचा उद्धार करणारे एक सुकन्या होणार आहे.”

दमा अतिशय आनंदी झाला. त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली. दोघेही खूप आनंदित झाले. कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरल्या. देवाने आपल्या शब्द खरा केला. जनाबाई थोडी मोठी होतास तिच्या आई-वडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. देवळामध्ये टाळ मृदुंगांचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरु झाला. विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले. जमिनी विठ्ठलाच हात जोडून अनन्य भावाने नमस्कार केला आणि जनाबाई त्याच्याकडे एकट पाहू लागली. तेथे समाधी लागली तेथून ती हलेनच.

मनोमन अंतर्यामीची खूणगाट पडली, की काय असे घडले. वडील एकसारखे तिला , “चला आता आपण जाऊया” असे म्हणत होते. पण तिचे आपले एकच तुम्ही जा मी येत नाही. अगं असं काय करतेस, आपण पुन्हा येऊ, आता घरी गेले पाहिजे. मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू पुसले. अग तुला एकटीला सोडून कसे जाऊ आम्ही, तुझ्याकडे कोण बघणार. जनाबाई म्हणाली विठ्ठल बघेल की, जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आई-वडील जड अंतकरणाने परत फिरले.

विठ्ठलाचे ध्यान करीत जणीने देवळातच रात्र काढली नंतर आई-वडिलांच्या नावाने तिने पुकारा केला. पण तिथं कोण होतं शेवटी पहाट झाली. देवळाच्या कडेला रडलेली होऊन ती एकटी उभी राहिली. नित्य नियमाप्रमाणे नामदेवांचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले आणि एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्यांनी तिला विचारले.

“कोण ग तू आणि एकटीच कशी झाली” जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि म्हणाले मीच आई-वडिलांना जा म्हणून सांगितले. मी येत नाही मी इथेच राहील. पण आता मला वाईट वाटतंय मी चुकलेच आणि तिला पुन्हा रडू कोसळले. हे पाहून दामा शेट्टींना दया आली ते म्हणाले, “अग तू रात्री कुठे होतीस. ” ती म्हणाली, “इथेच पांडुरंगा जवळ .” दामा शेट्टी तिला म्हणाले बाळ रडू नकोस, तू चल माझ्याबरोबर आमच्या घरी.” ती दामा शेट्टी बरोबर त्यांच्या घरी गेली.

घरी आल्यावर नामदेवाने विचारले, “ही कोण?” दामा शेट्टी म्हणाले, हिचे नाव “जनाबाई”. संपूर्ण रात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली. हिला आपल्याकडेच राहावयास आणली आहे. नामदेवांनी तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला आणि तेथे तो निघून गेले. त्यांच्या आईच्या गोलाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या. ती म्हणाली, “आपली गरिबी घरात ही १४ तोंडे आणि हे पंधरावे आणलेत.” “यांना खायला काय घालू?” तेवढयात दामा शेट्टी म्हणाले, “अगं , हे देवाघरचे लेकरू, आपण जे खातो तेच ते खाईल. शिवाय तुला इथे कामाला मदत होईल.”

जनाबाई घाबरून गेली पण लक्ष देवळातल्या पांडुरंगाकडे होते. जनी म्हणाली, “आई मी तुम्हाला जड होणार नाही, तुमच्या सर्व कामात तुम्हाला मी मदत करीन. दोन घास कमी खाईन. ” “घरातला केरकचरा काढीन, भांडी घाशीन , धुणे धुऊन , दळण करील.

जनाबाई कामाला लागली काम करताना तोंडातून सदैव विठ्ठलाचे नाव. अशा रीतीने जनाबाई आता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली. नामदेवाबरोबर ती नित्य नियमाने देवळात जाईल. भक्तीयुक्त अंतकरणाने देवाचे भजन करी. नामस्मरण करी, देव मनातून संतोष होऊन जाई.

देव भावाचा भुकेला, दुरी नाही देव त्याला. या उक्तीचा अनुभव जनाबाईंना पावलोपावली येऊ लागला.

झाड लोट करी जनी केरभरी चक्रपारी, राना गेली शेणासाठी मागे विठ्ठला धावे पाठी.

संत जनाबाईंचे पूर्ण नाव

जनाबाई यांच्या आई आणि वडिलांचे नाव दमा आणि करुंड असे होते

संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे?

श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत जनाबाईंनी महाद्वारी, ( इ.स.. १३५० ) आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधी घेतली.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला संत जनाबाई यांची माहिती , sant janabai information in marathi ,संत जनाबाई निबंध ,संत जनाबाई माहिती हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment