वासुदेव बळवंत फडके मराठी | vasudev balwant phadke in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही vasudev balwant phadke in marathi , वासुदेव बळवंत फडके मराठी , vasudev balwant phadke history in marathi , vasudev balwant phadke marathi, vasudev balwant phadke nibandh marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

वासुदेव बळवंत फडके मराठी | vasudev balwant phadke in marathi

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 मध्ये महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील शिरढोणे या गावी झाला. त्यांचे शिक्षण सध्याचे ठाणे जिल्यातील कल्याण आणि पुणे येथे झाले.

वासुदेव बळवंत फडके यांना सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. त्यांचे पूर्वज कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. ब्रिटिशांनी  स्थलांतर केल्यानंतर किल्ल्यांचे महत्त्व कमी झाले. वासुदेव बळवंत फडके हे हिंदुस्तानला स्वत्रंत मिळण्यासाठी लढले. त्यांनीं देशासाठी प्राणाची आहुती दिली. 

मुंबई येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढची काही वर्ष रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी ग्रँड वैद्यकिय महाविद्यालयामधे देखील लिपिकाची कामे केली.

त्यानंतर लष्करी विभागामध्ये लेखानियांत्रक म्हणून काम केले. आईच्या आजारपणामुळे देखभालसाठी तसेच आईच्या मृत्यूपश्चात अंत्यविधी साठी त्यांना ब्रिटिश सरकार कडून रजा मंजूर झाली नाही, म्हणून त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल प्रचंड संताप त्यांच्या मनात निर्माण झाला.

पुण्यामध्ये राहत असताना त्यांनी स्वदेशीचा प्रचार केला होता. त्याच्यावर न्यायमूर्ती रानडे , महात्मा ज्योतिबा फुले या लोकांचा प्रभाव निर्माण झाला होता. त्यांना सशस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण वस्ताद लहुजी साळवे यांसकडून मिळाले होते.

त्यांनीं एक्यावर्धिनी सभेची स्थापना केली होती. या सभेमार्फत त्यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून स्वतंत्र लढ्याचा पाया रचला होता. सुरवातीला त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे द्यायला सुरूवात केली. पण सामान्य जनमानसातून त्यांना तेवढा पाठिंबा मिळाला नाही.

म्हणून त्यांनीं तळागाळातील लोकांना एकत्र करून म्हणजेच महार, मातंग, रामोशी , मांग अश्या लढवय्या समाजातील लोकांना एकत्र करून तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन ब्रिटीशविरुद्ध उभे केले. 

बिर्टिशांबद्दल असलेली चीड, सामन्यावर अत्याचार म्हणून त्यांनी शस्त्राने हाती घेतले. जे सावकार सर्वसामान्य लोकांना लुटायचे त्यांच्यावर त्यांनी दरोडा घालायला सुरूवात केली. अश्या दरोड्यापासून स्वतंत्र काळात ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रात्रे  विकत घेतली. शास्त्रास्ते विकत घेतल्यानंतर उरलेला अडका, पैसा ते गरीब लोकामध्ये वाटून टाकायचे.

सशस्त्र क्रांती

१८७९ मध्ये त्यांनी दौलतराव नाईक , गोपाळ साठे , गोपाळ हरी कर्वे ,गणेश देवधर यांच्या मदतीने पहिला दरोडा पुण्यातील लोणीजवळील धामरी या गावी टाकला. हळूहळू पुण्यातील इतरही ठिकाणीं दरोडा टाकण्यात सुरुवात केली आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यास सुरूवात केली. दरोडा टाकताना फडके विशिष्ट वेशभूषा करीत, म्हणून त्याकाळी महाराज दरोडा टाकतात अश्या अफवा उठल्या होत्या.

पुढे काही दिवसानंतर ब्रिटिशांच्या हे लक्षात आले की या मागे वासुदेव बळवंत फडके आहेत. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनीं जी वैचारिक क्रांती घडवली होती , ती त्यांच्या लक्षात आली.

म्हणून पुण्याचा लष्करप्रमुख मेजर डॅनियल याने त्यावेळी फडकेंना पकडण्यासाठी 4000 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. या जाहीरनाम्यास प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी असे म्हटले की, “पेशव्यांचा पंतप्रधान म्हणून मी असे जाहीर करतो की, जो कोणी मुंबई चा गव्हर्नर रिचर्ड टेंपल याचे मुंडके कापून आणेल त्याला १०,००० रुपये पारितोषिक मिळेल.”

फडकेंना अटक 

इतर समाजाकडून संबंध बिघडल्याने फडके दक्षिण भारतातील श्री शैलाम मंदिरामध्ये आपले देहत्याग करताना त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट्ट भेटले. मोरेश्वर भट्ट यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी देहत्याग करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि त्यांच्या मदतीने हैद्राबादच्या नवाब कडून 500 रोहील्या आणि इतर 400 अशी ९०० सैनिकांची फौज निर्माण केली.

मेजर डॅनियलने फडके ज्या गाणगापूरात थांबले होते तेथे छापा घातला आणि तेथून त्यांना फडकेच्या ठिकाणाचा ठिकाणाचा सुगावा लागला.

एक दिवस फडके जेव्हा विजापूर येथील नवडगी गावातील बुद्ध विहारामध्ये आजारपणामुळे गाढ झोपेत होते. तेव्हा रंगोपंत महाजन यांचा छळ करून आणि निजामाचा पोलीस आयुक्त यांच्या मदतीने मेजर डॅनियलने तेथे जाऊन फडकेना अटक केली.

फडकेवरील खटला व शिक्षा 

सत्र न्यायालयात फडकेंना कठोर शिक्षांपासून वाचवण्यासाठी ग. वा. जोशी यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना काही यश आले नाही. त्यांनतर त्यावेळेचे उच्च न्यायालयातील प्रसिदध वकील महादेव चिमाजी आपटे यांनी सुद्धा त्यांचा फडकेकडून खटला लढून सुद्धा फारसा फरक पडला नाही.

अखेरीस , न्या. न्यूनहॅम याने फडकेंवर राणीच्या विरुद्ध युद्ध पुकारणे , दरोडे घालते असे गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आणि काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. फडकेंना तेहरान बोटीने एडन , येमेन या ठिकाणी पाठवण्यात आले.

१८८३ मध्ये त्यांना एडन येथे वीरमरण प्राप्त झाले. तुरुंगात असताना ब्रिटिशांनी त्यांचा खूप छळ केला , तसेच त्यांना क्षयरोग सुद्धा झाला होता.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला  vasudev balwant phadke in marathi , वासुदेव बळवंत फडके मराठी , vasudev balwant phadke history in marathi , vasudev balwant phadke marathi, vasudev balwant phadke nibandh marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment