मदर टेरेसा मराठी माहिती | mother teresa information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मदर टेरेसा बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही मदर टेरेसा मराठी माहिती , mother teresa information in marathi , mother teresa biography in marathi , मदर टेरेसा यांचा जीवन परिचय  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

मदर टेरेसा मराठी माहिती | mother teresa information in marathi

मदर टेरेसा मराठी माहिती | mother teresa information in marathi

मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये एका छोट्या शहरात स्कोपिया मेसडोनिया येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव निकोला आणि आईचं ड्राना होतं. आई वडिलांनी तिचे नाव ॲग्नस ठेवले होते. तिचं कुटुंब लोकांना अन्न आणि वस्त्र देऊन मदत करायचे. एग्नेस नऊ वर्षांची असताना तिचे वडील आजारी पडले आणि मृत्यू पावले कुटुंबाची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. बऱ्याच अडचणी असून सुद्धा तिने तिच्या तिन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिकवले.

तिने तिघांना धार्मिक ज्ञान शिकवायला सेक्रेट हार्ट चर्चमध्ये पाठवलं. ॲग्नसने खूप कमी वयात धार्मिक गोष्टी शिकण्यात रस दाखवला. शाळेचे सदस्य धार्मिक गोष्टींचा प्रचार करण्यासाठी बाहेरगावी जायचे. वयाच्या बाराव्या वर्षी तिला वाटलं, आपण गरीब लोकांना मदत केली पाहिजे.

तिने चर्च मधील फादरना मला गरीब आणि गरजू लोकांची मदत करायची आहे, असा विचार मंडला. वयाच्या सतराव्या वर्षी ॲग्नसने साध्वी (नन )(ईश्वराच्या कार्याला वाहून घेतलेली स्त्री) व्हायचं ठरवलं.

ॲग्नस जेव्हा १८ वर्षाची होती तेव्हा तिने घर सोडला , आणि आयरिश ननच्या संघात रुजू झाली. ज्याचे नाव होते, सिस्टर्स ऑफ लॉरेटो जे कलकत्त्यात काम करायचे. १९२८ साली तिने डबलिंग, आयर्लंड आणि दार्जिलिंग मध्ये प्रशिक्षण घेतलं आणि धार्मिक शपत घेतल्या. १९३१ मध्ये तिने टेरेसा हे नाव स्वीकारलं आणि शपथ घेतली. सुरुवातीला ती बंगालमधील हॉस्पिटलमध्ये काम करत होती. नंतर एक शिक्षिका म्हणून सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिकवू लागली. ती आपलं जेवण गरीब मुलांसोबत वाटून खायची. सगळी मुलं त्यांच्यावर प्रेम करायची.

एकदा ट्रेन ने दार्जीलिंगला प्रवास करताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा ध्येय लक्षात आलं, त्यांना त्यांच्या अंतर्मनातून आवाज ऐकू आला
(मला माझं पूर्ण आयुष्य गरीब व गरजू लोकांना मदत करण्यात घालवायचा आहे) आणि तिथून त्यांचा आयुष्यच बदललं. त्यांनी आरोग्य सेवेचा ट्रेनिंग घेतलं आणि कलकत्त्यातील गरीब लोकांचा उपचार मोफत करू लागली.

तिचं हे काम पाहून प्रभावित झाले. म्हणून ते सुद्धा पैसे, अन्न, औषध दान देऊन मदत करू लागले. फेब्रुवारी १९४९ मध्ये टेरेसाची विद्यार्थी सुभाषिनी तिला भेटायला आली. ती बंगालमधील एका श्रीमंत घरातली मुलगी होती.

सुभाषिनीला गरीब व गरजू लोकांना मदत करायची होती. तिला तेरेसा सोबत काम करायचे होते. सुभाषिनी घरच्यांची परवानगी घेऊन टेरेससोबत काम करू लागली. अशा प्रकारे एका मागोमाग एक बरेच जण टेरेसासोबत जोडले गेले. वर्षाच्या शेवटी तिच्या संघात १० नन होत्या. सगळ्यांचाच एक उद्देश होता. गरीब व गरजूंना मदत करणे, त्यांच्यापैकी कोणालाच त्या कामाचा पगार नव्हता. त्यांची जमापुंजी म्हणजे दोन साड्या काही गरजेच्या वस्तू आणि एक प्रार्थनेचे पुस्तक. ते खूप साधा आयुष्य जगायच्या. ते प्रार्थनेसाठी लवकर उठायच्या नाश्त्यामध्ये चहा आणि चपाती खायच्या.

रोज ते त्या गरीब घरांमध्ये जायचे आणि गरजूंना मदत करायच्या. टेरेसा आता मदर टेरेसा म्हणून ओळखू जाऊ लागली आणि तिची संस्था मिशनरीज ऑफ चारिटी म्हणून प्रसिद्ध झाली. सभासदांनी दारिद्र्य पवित्रता आणि अज्ञाधारकपणाची शपथ घेतली.त्यात त्यांनी एक चौथी शपथ जोडली, ती म्हणजे गरीब व गरजूंना मदत करणे, त्यांच्या संस्थेला खूप प्रसिद्धी मिळाली. मदर टेरेसाने ह्या प्रसिद्धीचा उपयोग लोकांसाठी केला. १९५७ मध्ये त्यांनी लेप्रसीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मदत केली.

हळूहळू त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामात वाढ करून कोलकत्तामध्ये शाळा सुरू केल्या. त्यांनी अनाथ मुलांसाठी आश्रम पण सुरू केले. लवकरच त्यांची संस्था भारतातल्या २२ शहरांमध्ये पसरली. त्यांनी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, तानजानिया, वेनेझुला आणि इटली सारख्या इतर देशांमध्येही आपल्या संस्थेचा प्रचार केला.

१९७९ मध्ये टेरेसाला नोबेल प्राईज फॉर पीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांच्या संस्थेने २१ देशांमध्ये ६१ शाखा उघडल्या होत्या. त्यांचे असे म्हणणे होते की, देवावर प्रेम करणं पुरेसं नाहीये आपल्याला गरीब आणि गरजू लोकांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे.

एक दिवस मदर टेरेसांना पोपला भेटण्याचं आमंत्रण देण्यात आलं. त्या पोपच नाव होतं, जॉन पॉल द सेकंड. मदर टेरेसाची त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. ती बातमी ऐकून त्या खूप खुश झाल्या.

पोप म्हणले, “मदर टेरेसा लोकांमध्ये तुम्ही खूप प्रसिद्ध आहात”. त्या म्हणाल्या “हो लोकांना माझं काम आवडतं आणि मी फक्त माझं काम करते.” पोप म्हणले, “मी आशा करतो, सगळेच लोक जर तुमच्यासारखा विचार करून काम करतील, तर जग सुंदर होईल.

५ सप्टेंबर १९९७ रोजी मदर टेरेसा आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या सेवेची दखल घेत भारतीय सरकारने त्यांना सन्मान दिला. त्यांच्या मृत्यूच्या वेळी मिशनरीज ऑफ चारिटी मध्ये ४००० च्या वर सिस्टर होत्या. सोबत तीनशे बंधू सभासद व १२३ देशांमध्ये ६१० संकल्प होते. मदर टेरेसांचं संपूर्ण आयुष्य जगासाठी प्रेरणादायक आहे.


मदर तेरेसा चे पूर्ण नाव काय?

मदर तेरेसा यांचे पूर्ण नाव अँजेझे गोंक्शे बोजाक्शिउ (Anjezë Gonxhe Bojaxhiu) आहे

मदर तेरेसा यांना किती पुरस्कार मिळाले?

मदर तेरेसा यांना भारतरत्न , पद्मश्री यांचबरोबर ७०० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.


मदर तेरेसा उदार होत्या का?

होय, मदर तेरेसा शांत , संयमी आणि सर्व दीन दुबळ्या , गरीब लोकांसाठी देवप्रमाणे होत्या.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मदर टेरेसा मराठी माहिती , mother teresa information in marathi , mother teresa biography in marathi , मदर टेरेसा यांचा जीवन परिचय  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment