पितृ पक्ष मराठी माहिती | pitru paksha information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये पितृ पक्ष बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही पितृ पक्ष मराठी माहिती , pitru paksha information in marathi , pitru paksha marathi mahiti , pitru paksha shradh rituals , pitru paksha naivedya in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

पितृ पक्ष मराठी माहिती | pitru paksha information in marathi

पितृ पक्ष मराठी माहिती | pitru paksha information in marathi

श्राध्दाचे महत्व | pitru paksha shradh rituals

भाद्रपदाचा महिना होता. साक्षात दत्तप्रभू सुमती आई कडे भिक्षा मागायला गेले. श्राध्द पक्ष सुरु होते. श्राध्दाचा स्वयंपाक सुमती आईने केला होता आणि साक्षात दत्तप्रभू तिच्याकडे भिक्षा मागायला गेले. आई भिक्षा वाढ !! अन्न श्राध्दासाठी तयार केलेले होते. आलेले यती हे साक्षात दत्तरुप आहेत, याची जाणीव कुठेतरी त्या सुमती आईच्या मनाला स्पष्टपणे संकेत देत होती. श्राध्द घालण्यापूर्वी श्राध्द भोजन सुमती आईने दत्त प्रभुंना दिले.

श्राध्द भोजन करुन दत्तप्रभू संतुष्ट झाले. संतुष्ट होऊन सुमती आईला दर्शन दिले आणि सांगितले, तुला हवा तो वर माग…! मग त्या सुमती आईन दत्तप्रभुंना एवढेच मांगितले की, तुमच्या सारखा चिरंजीव माझ्या पोटी येऊ दे. दत्तप्रभूसारखे साक्षात दत्तप्रभू पुन्हा कुठून निर्माण करायचे? आशिर्वाद तर दत्तप्रभूंनी सुमती आईला देऊन ठाकला. मग साक्षात दत्तप्रभू स्वतः त्या सुमती आईच्या पोटी जाऊन थांबले. पुढल्या वर्षी भाद्रपद महिन्यातल्या शुध्द चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीला त्या सुमती आईच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्म झाला.

दत्त प्रभुचा पहिला अवतार. ही कथा तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. या कथेविषयी यासाठी सांगतोय, कारण पितृपक्ष सुरु होतोय. पितृपक्षाबद्दल अनेक संभ्रम अनेकाच्या मनात आहेत. पितृपक्ष म्हणजे वाईट पक्ष. पक्ष पंधरवाडा, हे चांगले दिवस नाहीत. त्या दिवसात काहीही शुभ करायच नाही, वगैरे संभ्रम अनेकांच्या मनात असल्यामुळे या स्पष्टीकरणाविषयी गुरुमहाराज परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात ,की श्राध्द आणि पक्षाविषयी अनेक गैरसमजुती आपल्या मनात असतात. हा महिना भाद्रपद आहे. भाद्र, भद्र, या शब्दापासून आलेला हा भाद्रपद अत्यंत शुभ असा महिना आहे, म्हणून या शुभकाळामध्ये आपल्या पितृ, आपले पूर्वज- ज्याच्या वंशी आपण जन्माला आलो, ज्या आई वडिलांच्या पोठी जन्माला येऊन आपण या भूमीवरती जगतो आहोत, त्याच्या स्मृती जाग्या राहाव्यात, त्यांच पूजन व्हाव म्हणून अत्यंत शुभ असा महिना त्यासाठी निवडलेला आहे.

श्राध्द भोजना विषयी आपल्या मनात संभ्रम असतात. पण हिंदू ही फक्त धर्म संस्था नव्हेत तर ही अत्यंत प्रगल्भ अशी विचार संस्कृती आहे आणि म्हणून अत्यंत सुंदर असे विचार इथे प्रखरपणे नोदवल्या गेले आहेत. भाद्रपद हा अत्यंत शुभ महिना आहे. पितृ पंधरवडा पण शुभ आहे. श्राध्दाचे दिवस असले तरी ते कुठलेही कार्य सुरु करण्यासाठी अयोग्य दिवस नाहीत. हेच साक्षात दत्तप्रभूंनी पहिल्यांदा सांगितलं. आपल्याला असं अनेक ठिकाणी बघायला मिळतं कुणी श्राध्दाच जेवायला बोलावल, तर जावं की जाऊ नये- हा संभ्रम आपल्या मनात असतो.

अनेक लोक श्राध्दाचं जेवायला जात नाहीत. ते सांगतात आम्हाला श्राध्दाच जेवण चालत नाही. श्रध्देयांचा प्रसाद जर चालत नसेल, तर तुम्ही मनुष्यच नाही. मग तुमची अवस्था जनावारासारखी आहे, परमेश्वरा पेक्षाही श्रेष्ठ कोण तर आपले मातृ पितृ देवता म्हटलेले आहे. ध्यानाला बसतांना पण गुरुमहाराज सांगतात की, पहिल्यांदा आपल्या आईला वंदन करायचे. तिच्या चरणी मस्तक ठेवायचे. मग वडिलांना नमस्कार करायचा. आई वडिलांनंतर गुरुला वंदन करायचे.

मग आराध्याचे स्मरण करुन आराध्याला नमस्कार करायचा. वंदन करायचं, आणि मग ध्यान करायचं. बघा, आराध्याच्या आधी ,गुरुच्या आधी, आईवडील! त्या आईवडीलांना देव स्वरुप, देवापेक्षाही जास्त महत्व देणारी आपली संस्कृती आहे. याचा विसर पडता कामा नये. जे ब्राम्हण पुजा अर्जा करण्याचं काम करतात त्यांना नियम घातलेले आहेत. शास्त्राने श्राध्द, पक्ष, आणि मृतदेहाचे संस्कार हे पण या प्रत्येक आचार्यांनी करणं भाग आहे. अशी आपली संस्कृती आहे.

हिंदू संस्कृतीची विचारधारा किती सुंदर आहे बघा, एखादा सण असतो, गणेश चतुर्थी असते, समजा एखाद्या वेळेला नेमकं या सणाच्या दिवशी घरातल्या एखाद्या जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू होतो. आई असू देत, वडिल असू देत, आपली संस्कृती त्या दिवसा पासून तो सण खंडीत करते , आणि श्राध्द सुरु करते. कारण वर्षभरानंतर येणार ते वर्षश्राध्द आणि त्या दिवशी देवपूजेपेक्षाही श्राध्द जास्त महत्वाचे आहे. देव तर साधनेतून हृदयात निर्माण होणार आहेत, पण ही साधना करण्यासाठी देहरुप ज्या आई वडीलांनी आपल्याला दिलं, त्यांच देवत्व आणि आदर आपल्या संस्कृतीने जास्त महत्वाचा मानलेला आहे.

या विचार धारेतून हा श्राध्दाचा जो पंधरवाडा येणार आहे ,हा अत्यंत शुभ पंधरवडा आहे ही गोष्ट विसरुन चालणार नाही. ज्या ज्या लोकांच्या मनात असं असेल की हे वाईट दिवस आहेत, सगळयात पहिल्यादा ती संकल्पना डोक्यातून काढून ठाका. हे अत्यंत चांगले दिवस आहेत. आपले आई वडिल, आजी आजोबा ज्याच्यामुळे आपण हा भूलोक बघतो आहोत, त्याच्या स्मरणाचा, त्यांच्या पूजेचा हा काळ आहे. या काळात तुम्ही कुठलेही कार्य सुरु केले, तर निश्‍चितपणे तुम्हाला तुमच्या पितरांचे सुयोग्य आशिर्वाद लाभणार आहेत.

तुमचा आराध्य, परमेश्‍वर हा साधनेतून हृदयात स्थापित होता तिथे द्वैत संपवून अद्वैत साधायच, आत्म्याला परमात्मा रुपात मिसळायच, तो वेगळा नाहीच आहे. महत्व इथे आहे ते आई वडिलांच्या स्मरणाचं आणि पूजेचं. म्हणून या पितृपंधरवडयामध्ये त्यांच पूजन झालेच पाहिजे. दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो या संदर्भात! पहिली गोष्ट जर श्राध्दाच्या भोजनाला बोलावल्यानंतर परान्नाच घेत नसाल, व्रतस्थ असाल, तिथपर्यंत ठिक आहे. पण अन्यथा  श्राध्दाच्या भोजनाला कधीही नाही म्हणायचं नाही. तो प्रसादच आहे. तो काही वाईट नाही. कुणाची आई वाईट असू शकते का ? “माता कुमाता न भवती”, आई वाईट असूच शकत नाही, आई जेवढे आशिर्वाद देते किंवा वडिल तुमचे तुम्हाला जेवढे आशिर्वाद देतील तेवढे कुणीच तुम्हाला देऊ शकत नाहीत. त्यांना समर्पित केलेले श्राध्दाच नव्हे तो प्रसाद आहे. त्या प्रसादाची कधीही अवहेलना करु नये.

जेवढया श्रध्देने आपण या भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचा उत्सव साजरा करुन गणपतीचा प्रसाद सेवन करतो, तेवढयाच श्रध्देने आपण या पितरांचा प्रसाद पण सेवन करायला पाहिजे, त्याला नाही म्हणून नये. जेवढया सुवासिनी आहेत, त्यांना पितृ पंधरवाडयात कुणीही सुवासीनी म्हणून जेवायला बोलावले तर चुकूनही नाही म्हणून नये. इतर कुठलेही दिवस असू देत, आईनवमी असू देत, श्राध्द असू देत, पक्ष असू देत त्या दिवशी सुवासिनी (सवाष्ण) म्हणून जाणे भाग्याचे असते. कारण तिथ तुम्ही आई किंवा वडिल यांचे प्रतिनिधी म्हणून जात असता.

कुठलेही चुकीची कार्य करत नसता आणि आपला धर्म हेच सांगतो की ज्या प्रमाणे तुम्ही देवाचे पूजन करता त्याचप्रमाणे पितराचे पूजन व्हायला पाहिजे. ही गोष्ट जेव्हा लोकांच्या डोक्यामधून निघून जायला लागली. हा पित्रु पंधरवडा वाईट वाटायला लागला,श्राध्दच वर्ज ठरायला लागचे, तेंव्ही दत्तप्रभूना ही गोष्ट जाणवली की हे चूक आहे, म्हणून साक्षात दत्तप्रभू सुमती आईच्या घरी भिक्षा मागायला गेले, श्राध्दासाठी केलेले अन्न भिक्षा म्हणून घेऊन स्वतः दत्तप्रभूनी त्याचे भक्षण केले. याच्यापेक्षा मोठ शास्त्रवचन काय हवे? श्राध्दाचं अन्न भोजन कराव की करु नये? तर, जिथे दत्तप्रभू स्वतः श्राध्दाच अन्न भोजन करु शकतात तिथे आपली काय गोष्ट? म्हणून शास्त्र विचारानुसार, आपला भरम आणि पुरातन वैदिक संस्कृती आणि परंपरे नुसार, श्राध्द भोजन वर्ज्य नाही!

श्राध्दाच्या दिवशी ब्राम्हण, सवाष्ण यांना जेवायला त्यांच्या ठिकाणी बोलावल्यानंतर किंवा प्रसादाला बोलावल्यानंतर ते अन्न अजिबात वर्जित नाही. कुठलीही शुभ कार्य कारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा भाद्रपद महिना आहे. म्हणून  पितृ पितृपक्षाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. या व्यतिरिक्त या पंधरवडय़ात काय करायचे? हा आपल्या मातृपितृ वंदनेचा पंधरवडा आहे. म्हणून रोजच त्यांच स्मरण झालं पाहिजे. कुणाकडे श्राध्दाच्या भोजनाला बोलावल तर त्या ताटाभोवती नैवेद्य दाखवून तो आपल्या  पुर्वजांना-आई वडिल-आजी आजोबा ज्यांचा मृत्यु झाला असेल, त्यांना अर्पण करावा मात्र पितरांना नैवैद्य दाखवताना उलट्या बाजूने पाणी फिरवावे.

पंधरा दिवस रोज(Anti-Clock Wise) , ताटावर बसल की आपले पूर्वज किंवा श्रध्देय यांच स्मरण करुनच पहिला घास पोटात गेला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. हे घरातल्या प्रत्येक लहान मुलापासून, प्रत्येकाच्या मनावर ही गोष्ट बिबंवली गेली पाहिजे. हे पंधरा दिवस -जसे तुम्ही रोज देवांचं स्मरण करता, तसे आपल्या आई वडीलांना, पूर्वजाना स्मरण करुन त्यांना नैवेदय दाखूवन भोजन करायचं. स्वयंपाक जो आपण करतो तो देहासाठी! आत्माला स्वयंपाक काही चालत नाही. खीर, वडा, भात हे सगळं जे काही करतो.

तो आपण आपल्यासाठी करतो, आपल्याच देहाला ते लागते. पूर्वजाच्या देहाला लागत नाही, अन्न त्यांच्या पोटात जात नाही, पोटात आपल्याच जाते! पण त्यांच्या स्मृती जागृत ठेवून त्यांचे आशिर्वाद घेऊन पुढे पुढे जाण्याचे हे दिवस आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट या काळात आपल्या घरात एकदा तरीश्राध्द व्हायलाच पाहिजे. श्राध्द करा यच म्हणजे काय करायच? काही विशेष करावे लागत नाही, खुप अवडंबर पण माजवावे लागत नाही. श्राध्द या पंधरा दिवसात कधीही करता येईल. तिथी पहिलीच पाहिजे असे नाही. या पितृपक्षातील कुठल्याही सुट्टीच्या दिवशी श्राद्ध करण्यास हरकत नाही.

वेळच नाही मिळाला तर सर्वपित्री आमावस्येच्या दिवशी श्राध्द आपल्याला निश्‍चितच करता येऊ शकतं, शक्‍य असेल तर ज्या दिवशी आपले आप्त गेले त्या तिथिला, अन्यथा सर्वपित्री आमावस्येला. आपण रोजच जेवतो- वरण, भात,भाजी, पोळी, घरात तयार होतेच त्याला दोनच गोष्टी जोडायच्या असतात, एक म्हणजे तांदळाची खीर! ती पण करायला वेळ नसेल, अवधी नसेल, तर भात दूधात कालवायचे आणि साखर घालायची! अवडंबर माजवण्यापेक्षा श्रध्दा भाव असणं जास्त गरजेचे आहे.

दुसरा पदार्थ म्हणजे उडदाचे वडे. उदडाचे वडे पण करायला अगदी सोपे असतात, स्वयंपाक करायला घेतला की अर्धा तास आधी, उदडाची डाळ भिजून मिक्सरमध्ये दळली, की पाच मिनिटात भाजी फोडणीला घालायाच्या आधी तेलात वडा तळून घेतला तरी चालू शकते! इतकं हे साधं सोपं आहे.

श्राध्दाच भोजन म्हणजे काय? मूळ श्राध्द भोजना मध्ये काय काय असतं? एक तर तांदळाची खीर,उडदाचे वडे आणि पंचामृत! चिंच गूळाचा एकत्र शिजवलेला पाक ज्यात शेंगदाणे, खोबरे घालून त्याला चविष्ट बनविले जाते. तिळाची फोडणी घालून केलेले पंचामृत हा श्राद्धाचा महत्वाचा भाग. भाज्या वगैरे तुम्हाला करायच्या किंवा जे काही करायचे त्याला फारसे महत्व नाही. पण दोन उदडाचे वड़े आणि खीर, शक्‍य झालं तर एका पानावर हा नैवैद्य दाखवायचा! शक्य असेल कोणाला जेवायला बोलावण तर त्यांना जेऊ घालावे,नसेल शक्‍य, तर गाईला पान लावावे.

पण हा नैवैद्य आपल्या पितरांना, आपल्या आईवडीलांना दाखवणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. वडा आणि खीर केल्यानंतर तर तुमच्या मुलांनाही कळत राहील, की श्राध्द पक्ष या पध्दतीने करतात. गुरुजींना बोलावून श्राध्द केलच पाहिजे असे बंधन, पुढल्या पिढीवर मला तर नाही वाटत तुम्ही टाकू शकता. पण हे किती सहज आहे, सोप आहे, तुम्ही पुढच्या पिढीच्या मनावर निश्‍चित बिंबवू शकता, की वरण भात भाजी पोळी तर आपणच खातो. नाहीच सकाळी जमलं तर श्राद्धच न करण्यापेक्षा रात्री श्राध्दाचा स्वयपाक करून नैवैद्य दाखवायलाही हारकत नाही.

हा नैवैद्य मात्र आपल्या पितरांना दाखवला गेलाच पाहिजे. संस्कृतीची ही जपणूक झालीच पाहिजे आणि कुठल्याही घरात श्राध्दच झाले नाही, असे होता कामा नये, श्राध्दच जर झाली नाहीच तर आपले पितर श्रध्देय राहणार नाहीत. खूपदा अस घडत की आई वडिलाशी खटके उडत असतात. त्यांचे स्वभाव वेगळे असतात. आपले स्वभाव वेगळे असतात. आपल्या मूलांचे ही स्वभाव वेगळे असतात, तीच परिस्थिती उद्या आपल्यावर येणार आहे. आणि आपण गेल्यानंतर आपली मूलं जर आपल स्मरण पण करणार नसतील, तर ती मूलगा किंवा मुलगी होण्याच्या अट्टास धरायचा कशासाठी? नाहीच झाली तर किती उत्कृष्ट! आणि जर होता आहेत, झाली आहेत, तर हा श्रध्दाभाव तुम्हाला तुमच्या आई वडिलाबद्दल निर्माण करता येईल.

आपल्या आई वडिलांच्या केवळ उत्कृष्ट स्मृती जागवण्यासाठी हे श्राद्ध विधान आहे आणि आपले आई वडील हे देवांपेक्षाही श्रध्देय आहेत. श्राध्द करणार नसाल तर नवरात्रही करु नका, आणि नवरात्र केले नाही तर पुढे दिवाळी पण करु नका. महत्व जेवढ जास्त देव पुजेला तेवढच श्राध्दाला म्हणून दत्तप्रभूना जर श्राध्दाच अन्न चालत असेल तर आपल्यालाही चालायलाच पाहिजे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला पितृ पक्ष मराठी माहिती , pitru paksha information in marathi , pitru paksha marathi mahiti , pitru paksha shradh rituals , pitru paksha naivedya in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment