मटन पुलाव रेसिपी | mutton pulao recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मटन पुलाव रेसिपी ( mutton pulao recipe in Marathi ) दिली आहे.  मटन पुलाव , मटन पुलाव दाखवा , मटन पुलाव रेसिपी , मटन बिर्याणी , mutton biryani recipe in Marathi , 1 kg mutton biryani recipe in Marathi ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा. 

मटन पुलाव रेसिपी | mutton pulao recipe in Marathi

मटन पुलाव रेसिपी साहित्य ( mutton pulao recipe ingredients in Marathi )

१) १ किलो मटण

२) १/२ किलो बासमती तांदूळ

३) १ वाटी तळलेला कुरकुरीत कांदा (वनस्पती तुपात तळलेला)

४) १/२ वाटी काजू तळलेले

५) १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी

६) २ टेबलस्पून आलेलसूण पेस्ट २ टेबलस्पून कोल्हापुरी कांदामसाला, हळद

७) २ टेबलस्पून कोल्हापुरी कांदा मसाला, हळद

८) १ टी-स्पून तिखट

९) १/२ वाटी दही

१०) ७-८ लवंगा, ४-५ दालचिनी तुकडे, ४-५ मिरी, ४-५ वेलदोडे, तेजपत्ता, शहाजिरे, २ बादल

११) १ ॥ वाटी वनस्पती तूप, १/२ वाटी घरगुती तूप

मटन पुलाव रेसिपी कृती ( mutton pulao recipe steps in Marathi )

१) तांदूळ धुवून ठेवा. मटणाला दही १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, १ टी स्पून गरम मसाला टाकून कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घ्या. मटण पिसेस व सूप वेगळे करा.

२) कढईत १ वाटी तूप टाकून गरम करा. त्यात कांदा टाकून परता. कांदा लाल झाल्यावर त्यात शिजलेले मटणाचे बाजूला ठेवलेले पिसेस तळून घ्या. त्यात कांदामसाला, गरम मसाला टाकून त्यात काजू व तळलेला कांदा टाकून गॅस बंद करा. हे मिश्रण बाजूला ठेवा. त्यात १ टी-स्पून लाल तिखट टाका.

३) मोठ्या पातेल्यात १/२ (अर्धी) वाटी तूप टाकून त्यात लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे, तेजपत्ता, बादल, शहाजिरे टाका. तांदूळ टाकून परता. मीठ टाका. त्यात १ टेबलस्पून आलंलसूण पेस्ट टाकून परता. मटणाचे काढून ठेवलेले सूप व जरुरीनुसार गरम पाणी टाकून भात मोकळा शिजवा.

४) भात शिजल्यावर त्यात तयार केलेले मटण मसाला टाकून चांगले हलवून घ्या. वरून चांगले तूप टाकून झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. भात झाल्यावर वरून उरलेले तळलेले काजू व कांदा टाकून पुलावबिर्याणी गरमागरम सर्व्ह करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला मटन पुलाव , मटन पुलाव दाखवा , मटन पुलाव रेसिपी , मटन बिर्याणी , mutton biryani recipe in Marathi , 1 kg mutton biryani recipe in Marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment