भ्रमणध्वनी शाप की वरदान | भ्रमणध्वनी नसते तर निबंध | mobile phone naste tar

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये भ्रमणध्वनी शाप की वरदान निबंध बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही भ्रमणध्वनी शाप की वरदान , भ्रमणध्वनी नसते तर निबंध , if there were no mobile phones essay in marathi , mobile shap ki vardan , mobile phone naste tar याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

भ्रमणध्वनी शाप की वरदान | भ्रमणध्वनी नसते तर निबंध | mobile phone naste tar

भ्रमणध्वनी शाप की वरदान | भ्रमणध्वनी नसते तर निबंध | mobile phone naste tar

‘गरज ही शोधाची जननी आहे’, ह्या म्हणीनुसार माणसाने गरजेपोटी आपल्या बुद्धी व विज्ञानाच्या आधारे विविध क्रांतिकारक शोध लावले. त्यांच्यापैकीच एक सर्व महान असा शोध म्हणजे भ्रमणध्वनीचा शोध आहे. धीरूभाई अंबानी यांच्या ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या घोषणेने भ्रमणध्वनीने संपूर्ण जगच जिंकून घेतले आहे. श्रीमंतांपासून ते तळा-गाळातील मागासवर्गीयपर्यंत सुद्धा या भ्रमणध्वनीचा प्रसार आणि प्रचार झालेला दिसतो आहे.

खूपच कमी कालावधीमध्ये सर्वच वयोगटातील लोक या भ्रमणध्वनीच्या पूर्ण आहारी गेले आहेत. आपण कुठेही गेलो तरी , लोक भ्रमणध्वनीवरून कोणाशी ना कोणाशी तरी बोलत असतातच. उदारणार्थ, जेवण करताना, गाड्यांतून प्रवास करताना, रस्त्याने चालताना, गाडी चालवत असतानाही लोक बोलत असतात. म्हणूनच अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. नेहमी भ्रमणध्वनीवर बोलत राहिल्याने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्या सहवासातील संवादाचे सुख हरपलेआहे.

त्यामुळे माणसे भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर चाललेली आहेत. आपण दिवसातील जास्तीत जास्त वेळ भ्रमणध्वनीमध्ये घालवल्यामुळे आज माणसाला स्वत:कडेही पाहण्यासाठी वेळ उरलेली नाही. जो तो आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झाला आहे.

भ्रमणध्वनी जितका आपल्यासाठी उपयोगी आहे, त्याचप्रमाणे त्याचे शारीरिक दुष्परिणामही तेवढेच गंभीर आहेत. सतत भ्रमणध्वनी कानाला लावून बोलत बसल्यामुळे किंवा गाणी ऐकत राहिल्यामुळे, त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा मानवाच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. याचा भ्रमणध्वनीने इतरांना बदनामीकारक मजकूर पाठवले जातात.

तसेच मनोरंजनाचे साधन सुद्धा आपल्या भ्रमणध्वनीकडेच पहिले जाते. त्यामुळे अनके ठिकाणी माणसातील विकृतीला वाव मिळून गुन्हयांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. बरेचदा समाजात अफवांचे पसरवण्यास समाजकंटक याच भ्रमणध्वनीचा उपयोग करतात. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण अंतरंगी असा विचार येतो कि , भ्रमणध्वनीचा शोध हा मानवी जीवनाला शाप तर नाही ना?

भ्रमणध्वनीचा सर्व बाजुंनी विचार केला तर, मात्र भ्रमणध्वनीला शाप म्हणणे म्हणजे एकाच पैलूचा विचार केल्यासारखे होईल. कारण शेकडो मेल दूर वर असलेल्या व्यक्तीशी आपण कमीत कमी खर्चात आणि जलद गतीने संपर्क साधू शकतो. जर भ्रमणध्वनीचा शोध लागला नसता तर आपल्याला पूर्णपणे पत्रव्यवहार आणि मानवी दूतांवर अवलंबून राहावे लागले असते. सण समारंभ व इतर आनंदाच्या प्रसंगी आपण आपल्या माणसांपासून दूर असलो, तरी भ्रमणध्वनीमुळे त्यांना शुभेच्छा देता येतात. त्यांची खुशाली विचारता येते.

एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल , किंवा आपल्या घरी कोणता सण किंवा समारंभ असेल, तर आपण आपल्या आप्तेष्टांना क्षणार्धात संपर्क साधू शकतो. आपली नाती चिरंतर ठेवण्यासाठी हा भ्रमणध्वनी मोलाची भूमिका बजावतो. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा अकस्मात निधन झाले , तर जलद मदतीची पूर्तता याच भ्रमणध्वनीमार्फत केली जाते. या भ्रमणध्वनीचा वापर करून आपण आपल्या आठवणी साठवून ठेवू शकतो आणि नंतर गरजेनुसार आपण त्या पाहू शकतो. आपण आपले वाढदिवस , लग्न , उत्सव यांच्या छायाचित्रांचे संग्रह करून दीर्घ काळापर्यंत त्यांची साठवणूक करू शकतो.

सध्याच्या जलद गतीच्या जीवनामध्ये भ्रमणध्वनी हा एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. या भ्रमणध्वनीमुळे आपण घर बसल्या वीज बिल , गॅस बिल , टीव्ही बिल , फोन बिलचा भरणा करू शकतो. त्याचप्रमाणे विमान , रेल्वे , सिनेमा , इत्यादीची तिकीट अगदी सहजरित्या काढू शकतो. भ्रमणध्वनी हा छोट्या संगणकासारखाच काम करतो. ज्याची कार्यक्षमता तसेच किंमत संगणकापेक्षा कमी असते. भ्रमणध्वनी हा संगणकाच्या तुलनेत हलका असल्यामुळे तो हाताळणे सोपे जाते व सहज कुठेही नेणे शक्य होते.

भ्रमणध्वनी हा सगळ्या उपयुक्त साधनांचा जणू पेटाराच आहे. भ्रमणध्वनीत संपर्कासाठी, संदेश पाठवण्यासाठी सोय तर असतेच, पण छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा, वेळ पाहण्यासाठी घड्याळ, तारीख व वार बघण्यासाठी दिनदर्शिका अशा सगळ्या सोयी एकत्र उपलब्ध असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सोबत बाळगण्याची आवश्यकता रहात नाही.

ज्याप्रमाणे भ्रमणध्वनीचे फायदे आहेतच त्याप्रमाणे तोटेही आहेत, तरी तो भ्रमणध्वनीचा दोष नसून ते उपकरण वापरणाऱ्या माणसाचा दोष आहे. तेव्हा भ्रमणध्वनी हा शाप की वरदान हे फक्त आपण त्याचा कसा उपयोग करतो यावर अवलंबून आहे. आपण जर चांगल्या गोष्टी साठी त्याचा वापर केला तर तो वरदानच आहे आणि चुकीचा वापर केल्यास शाप ठरण्यास वेळ लागणार नाही.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला भ्रमणध्वनी शाप की वरदान , भ्रमणध्वनी नसते तर निबंध , if there were no mobile phones essay in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment