विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | importance of jokes essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये विनोदाचे महत्व निबंध बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही विनोदाचे महत्व , मानवी जीवनातील विनोदाचे स्थान , importance of jokes essay in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | importance of jokes essay in marathi

विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | importance of jokes essay in marathi

सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे
भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढविणाऱ्या संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे हे बोल आहेत. आयुष्यात प्रत्येकाला दुःखाचे डोंगर पार करावे लागतात, तेव्हा अल्प असे सुख त्याच्या वाट्याला येते. मानवी जीवनातील पर्वताएवढ्या दुःखाने भरडून जाताना विनोदाचा आधार मोलाचा ठरतो. विनोदामुळे हास्य निर्माण होते; आणि ‘हास्य’ ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. म्हणूनच तर मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पूर्वी राजे-महाराजांच्या काळात राजदरबारी विदूषकाची नेमणूक करत असे. नित्याच्या कामकाजातून राजाची व दरबाराची करमणूक व्हावी, हे त्यामागचे कारण असे. विनोदाने घटकाभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो आणि त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सुसहय होतो.

मानवी जीवनातील विनोद हा बरेचदा शब्दांच्या अर्थाच्या प्रसंगांच्या अथवा कल्पनेच्या चमत्कृतीपूर्ण वापरामुळे होतो. मानवी जीवनातील अनेक तऱ्हेच्या विसंगती हे विनोदाचे उगमस्थान आहे.

मराठी साहित्यातील विनोदी लेखनाचे दालन अनेक मान्यवर विनोदी लेखकांनी समृद्ध केलेले आहे. चि. वि. जोशी (चिमणरावांचे चऱ्हाट), प्र. के. अत्रे (झेंडूची फुले), पु. ल. देशपांडे (व्यक्ती आणि वल्ली), द. मा. मिरासदार ( माझ्या बापाची पेंड), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (सुदाम्याचे पोहे), राम गणेश गडकरी (संपूर्ण बाळकराम) अशी बरीच नामावली आपणास सापडते. या सर्वांच्या लेखनातून व्यक्त होणारा विनोद वेगवेगळ्या प्रकारातील असला, तरी त्यामागे हेतू हाच की माणसाला त्याच्या आयुष्यातील चार सुखाचे क्षण या विरंगुळ्यातून मिळावेत.

बरेचदा लोक आपल्या आयुष्यातील दुःखाचा विसर पडून क्षणभर दैनंदिन ताण-तणावांतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून विनोदी साहित्य अगदी आवडीने वाचतात.यामुळे आपण थोडे अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

यापूर्वीचेही जर संत वाङ्मय आपण पाहिले, तर त्यातसुद्धा विनोदाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ लिखित ‘मला दादला नको ग बाई….’ सारखी समाज प्रबोधनपर विनोदी अंगाने जाणारी ‘भारूड’ ही काव्य रचना. या रचनेत केवळ हसवणे, मनोरंजन करणे हेच विनोदाचे उद्दिष्ट मर्यादीत न राहता त्यातून लोकजागृतीही घडताना दिसते.

आजच्या स्पर्धेच्या युगात जगताना ज्या ताण-तणावातून जावे लागते, त्यात थोडा विसावा, विरंगुळा म्हणून दूरदर्शन, खाजगी टी.व्ही. चॅनेल्सवरसुद्धा विविध विनोदी कार्यक्रमांची मेजवानीच आपल्याला मिळते आहे. अशा वेळी जेव्हा घरातील लहान-थोर मंडळी एकत्र बसून मनमुराद हसतात, तेव्हा कुटुंबातील सर्व ताण-तणाव नाहिसे झाल्यासारखे वाटतात आणि एक वेगळा निरपेक्ष, निखळ आनंद सर्वांनाच अनुभवायला मिळतो.

विनोदामुळे जीवनाला प्रवाहीपणा येऊन जीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने खेळकरपणाने उपभोगण्याची लज्जत वाढते, म्हणूनच ‘विनोद’ हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे, तर ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा सुखी जीवनाचा मंत्र आहे.

असे म्हणतात की , हसल्याने आयुष्य वाढते. तसेच तोंडाच्या जबड्याचा व्यायाम होतो. आपण सकाळी किंवा संध्याकाळी उद्यानामध्ये पहिले असेल ,अनेक जेष्ठ नागरिक खोटे हसण्याचा व्यायाम करून आनंद लुटून दीर्घायुषी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला विनोदाचे महत्व , मानवी जीवनातील विनोदाचे स्थान , importance of jokes essay in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment