लोकमान्य टिळक माहिती मराठीत | lokmanya tilak information in marathi

लोकमान्य टिळक माहिती मराठीत | lokmanya tilak information in marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक | लोकमान्य टिळक

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये लोकमान्य टिळक यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही लोकमान्य टिळक माहिती मराठीत , lokmanya tilak information in marathi , information about lokmanya tilak in marathi , lokmanya tilak marathi mahiti , speech on lokmanya tilak in marathi याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मूळ नाव होतं. केशव टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतल्या मधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखळगाव येथे झाला. वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचं नाव पार्वती बाई असे होते. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांचे बदली पुण्याला झाली. प्राथमिक शिक्षणानंतर बाळ पुण्यात आले.

आपल्या हुशारीने टिळकांनी शिक्षकांचे प्रेम संपादित केले. शाळेत असतानाचे टिळकांची शेंगांची गोष्ट अजूनही प्रसिद्ध आहे. बालपणापासूनच अन्याय सहन न करण्याची वृत्ती त्यांच्या वागण्यातून पाहायला मिळत होती. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला होता. पुण्याला आले पण तिथे त्यांच्या आईचे निधन झालं आणि वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांना देखील स्वर्गवास झाला.

त्यानंतर त्यांचा सांभाळ काका गोविंदपंत यांनी केला. वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी बाळ यांचा विवाह दहा वर्षांच्या तापी बाई बरोबर करून दिला. कुस्ती पोहोणे, नवका चालविणे हे त्यांचे आवडते खेळ होते. परिपूर्ण आहार आणि त्याच सोबत शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यासाठी व्यायाम करायला त्यांना आवडत असे. १८७२ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले.

वडीलोपार्जित शेती सांभाळत असताना शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झालं. तेव्हा त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर एका शिक्षकाची नोकरी स्वीकारली. कारण संस्कृत आणि गणित या विषयांचा त्यांचा अभ्यास गाढा होता. डेक्कन कॉलेज यातून त्यांनी १८७६ मध्ये बीएच पदवी संपादित केली आणि मग १८७९ साली त्यांनी एलएलबी ची पदवी मिळाली.

डेक्कन कॉलेज जात असताना त्यांचा विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. हे तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. त्यावेळी भारतात राज्य होतं ते इंग्रजांचा. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणाऱ्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केलं पाहिजे. यावर या तिघांचे एकमत झालं आणि यातून त्यांनी १८८० साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

केसरी आणि मराठा वृत्तपत्र

या तीनही देशभक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुर ते शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे, यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. टिळक भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध नेहमीच असंतोष निर्माण करीत असत. त्यामुळे त्यांना असंतोषाचे जनक असेही संबोधण्यात आलं. सरकारला केसरी आणि टिळक यांचा आता धाक निर्माण होऊ लागला होता.

कोल्हापूर संस्थांचे दिवाण माधवराव बर्वे आणि ब्रिटिश सरकार यांचं साटंलोटं टिळकांनी आपल्या लिखाणातून जगासमोर आणलं. तेव्हा बरव्यांनी टिळकांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आणि टिळकांना तेव्हा पहिला तुरुंगवा झाला.

तुरुंगातून सुटून आल्यावर टिळक आगरकरांच्या पुढाकारांना १८८५ साली पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. तिथे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. एकीकडे वृत्तपत्राचे काम सुरू होतच. पण नंतर कॉलेजच्याशी संबंध तोडून टिळक स्वतंत्रपणे सामाजिक आणि राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भिड उग्र आणि सत्य लेखनामुळे केसरी लोकप्रिय होऊ लागला.

प्लेगची साथ आणि रँडची हत्या

मुंबईत साथीच्या प्लेगची साथ पसरली. १८९७ येईपर्यंत ही साथ थेट पुण्यापर्यंत येऊन पोहोचली. हा रोग अत्यंत संसर्गजन्य होता या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यामुळे सरकारने त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी रँड नावाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्यांना रोगग्रस्त लोकांना वेगळा करणे सुरू केले.

पण या काळात अनिर्बंध सैन्याकडून लोकांवर अनेक अत्याचार झाले. लोकांना प्लेग पेक्षा रँड आणि ब्रिटिश सैनिकांची जास्त धास्ती वाटायला लागली. टिळकांनी तेव्हा केसरी आणि मराठ्याच्या माध्यमातून यावर तोफ डागली. टिळक निर्जंतुकीकरण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते. पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता. २३ जून १८९७ ला चाफेकर बंधूंनी रँड आणि त्याचा सहकारी आयुर्वेद याची गोळ्या घालून हत्या केली.

चाफेकाराने अटक करून फासावर चढवण्यात आलं. पण टिळकांवर सुद्धा रँडच्या हत्येच्या गटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला. केसरीमध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? त्यात सोबत राज्य करणे म्हणजे सूड उगवणे हे दोन अग्रलेख लिहिले आणि टिळकांना पुन्हा तुरुंगवासात पाठवला. सरकारच्या कृतीचा परिणाम मात्र उलटा झाला टिळकांना अधिकच लोकप्रियता मिळाली आणि टिळक लोकमान्य नेता झाले.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या डोळ्यात तर स्वराज्याविषयीची निष्ठा दिसत होती. राष्ट्रीय पातळीवर सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर केसरीतून लेखन करतानाही आर्यांचे वसती स्थान, ओरायन शास्त्रीय पंचांग गीता रहस्य असे ग्रंथ लिहून त्यांनी आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला.

सार्वजनिक गणेश उत्सव आणि श्री शिवछत्रपती जयंती उत्सव

समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्रित यावर जुन्या आणि नव्या पिढीच्या मनात स्वातंत्र्यप्रेम जागृत करावं, या उद्देशाने मोठा प्रचार व्हावा म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेश जयंती उत्सव आणि श्री शिवछत्रपती जयंती उत्सव करण्यास सुरुवात केली १२ मे १९०८ च्या केसरी त्यांनी लिहिलेल्या देशाचे दुर्दैव या लेखांबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला.

सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडलेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठवण्यात आलं. हा तुरुंगवास भोगत असताना त्यांनी कर्मावर आधारित गीता रहस्य लिहिलं आणि याच काळात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. पण त्यांनी हे दुःख शांतपणे पचवले.

आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड , उतार वयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थ पणाने पूर्ण विश्रांती घेत नसतात.

एकीकडे औषध उपचार चालू होते पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. सन १९२० च्या जुलैमध्ये त्यांना हिवतापन हेरल्या. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय कोणताही उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात राहत होते. निफाड डॉक्टरांचे उपचार सुरू होते. पण थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेच येऊ लागले. त्यानंतर त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली आणि अस्वस्थता इतकी वाढली की एक ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास यह लोकांची यात्रा संपली.

भारताचा तेजस्वी सूर्य मावळला विला, राजकारण, तत्त्वज्ञान , खगोलशास्त्र, लेखन ,न्यायशास्त्र , सनातन धर्मग्रंथ , गणित , संस्कृत यांसारख्या अनेक विषयांमध्ये मातब्बर असणार व्यक्तिमत्व खरंच कौतुकास पात्र आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला लोकमान्य टिळक माहिती मराठीत , lokmanya tilak information in marathi , information about lokmanya tilak in marathi , lokmanya tilak marathi mahiti , speech on lokmanya tilak in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

3 thoughts on “लोकमान्य टिळक माहिती मराठीत | lokmanya tilak information in marathi”

Leave a Comment