हरतालिका व्रत कथा मराठी | hartalika vrat Katha in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये हरतालिका व्रत बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही हरतालिका व्रत कथा मराठी , hartalika vrat Katha in marathi  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

हरतालिका व्रत कथा मराठी | hartalika vrat Katha in marathi

हरतालिका व्रत कथा मराठी | hartalika vrat Katha in marathi

या कहाणीच पठण अथवा श्रवण केल्याने कुमारीकेस भरभराट होऊन मिळालेल्या पतीस दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्राप्त होते.

कथेला सुरुवात करूया. एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले. स्वामी….

सर्व व्रता मध्ये चांगलं असं व्रत कोणतं… श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखाद्या व्रत असेल, तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा भगवान शिव म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्व व्रता मध्ये सर्व श्रेष्ठ आहे.

हे व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस. आणि त्या व्रताच्या पुण्या मुळे तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावा लागते. ते तू पूर्वी केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन थंडी पाऊस ही तिनही दुःख तू सहन केलीस.

हे तुझे कष्ट पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले. अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात नारद मुनी तेथे आले. हिमालयाने त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचे कारण विचारले.

तेव्हा नारद मुनी म्हणाले आपली कन्या उपवर झाली आहे तेव्हा आपण ती आता विष्णूंना द्यावी तेच त्याच्यासाठी योग्य पती आहे आणि त्यांनी मला आपल्याकडे मागणी करण्यासाठी पाठविला आहे आणि म्हणूनच मी इथे आलो आहे.

हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. त्यानंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ते सगळे एकच कळविली आणि आपण निघून दुसरीकडे गेले होते.

महर्षी नारद गेल्यानंतर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस दुःखी झालीस. तेव्हा तुझ्या या दुःखाचे कारण तुला विचारले. तेव्हा तू सांगितलंस की महादेवा व्यतीरिक्त मला दुसरा पती करणे नाहीस, असा माझा निश्चय आहे. असे सांगून माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता याला उपाय काय करावा असे तू विचारलस.

मग तुला तुझ्या सखी ने एका घोर अरण्यामध्ये नेले. तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा होती. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तेथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथले माझे आसन हालले आणि त्या नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले. तुला वर मागण्यास सांगितला.

तेव्हा तू म्हणालीस की, तुम्ही माझे पती व्हावे. तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी कोणती इच्छा माझी नाही त्यानंतर मी ती गोष्ट मान्य केली आणि पुढे गुप्त झालो.

पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत-पूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणी सह त्याचं पार्न केलंस, इतक्यात तूझे पिता तेथे आले. त्यानी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे आश्वासन तुला दिले. तुला घेऊन ते घरी गेले. नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले.

अशी या व्रता मुळे तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. हरत म्हणजे पळवून नेणें आणि आलीका म्हणजे सखीने. तुझ्या सखीने तुला पळवून नेऊन अरण्याच्या एका गुहेमध्ये ठेवून तुझ्याकडून हे व्रत आणि पूजा करून घेतली. म्हणूनच याला हरतालिका असे म्हणतात.

या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो, सात जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी महिलांनी अजिबात काही खाऊ नये. काही खाल्लं तर दारिद्र्य येते, पुत्रशोक होतो, सात जन्म त्या वंध्या होतात.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला हरतालिका व्रत कथा मराठी , hartalika vrat Katha in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “हरतालिका व्रत कथा मराठी | hartalika vrat Katha in marathi”

Leave a Comment