अरुण गवळी यांची माहिती | arun gawali information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये अरुण गवळी बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही अरुण गवळी यांची माहिती , arun gawali information in marathi , अरुण गवळी जीवनचरित्र , arun gawali marathi mahiti , arun gawali yanchi mahiti याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

अरुण गवळी यांची माहिती | arun gawali information in marathi

अरुण गवळी यांची माहिती | arun gawali information in marathi

अरुण गवळी हे एक असं नाव ज्याने गँगस्टर म्हणून केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर जगभरात प्रसिद्धी मिळवली. ज्याच्यावर काही चित्रपट निघाले, तर काहीजण आजही त्यांच्या नावाने थरथर कापतात. अरुण गवळी यांचा जन्म अहमदनगरच्या कोपरगाव मध्ये झाला. त्यांचा कुटुंब मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये राहायचं. १९५० साली यांचे वडील गुलाबराव यांनी खंडोबा मधून मुंबईकडे निघाले आणि मग ते मुंबईतच स्थाईक झाले.

अरुण गवळीला शालेय शिक्षण घेत असताना पाचवीमध्ये शाळा सोडावी लागली. त्याचे खरे कारण त्यांच्या कुटूंबावर
निर्माण झालेली आर्थिक अडचण हे आहे.

मुबंईमधील भायखळा जवळील सात रस्त्यावर त्यांच्या वडिलांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. आपल्या वडिलांना हातभार लावणारा अरुण गवळी सुद्धा दूध विक्रेता म्हणून काही काळ काम करत होता. पण केवळ दूध विकून त्याच्या गरजा भागणाऱ्या नव्हत्या. कारण त्याची भूक खूप मोठी होती आणि त्यांनी अखेर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रामा नाईकच्या गॅंगमध्ये विश्वास संपादित करून स्थान मिळवले.

पण नंतर खटाव मिल्स मधील काम सोडून अमर नाईक गॅंग मध्ये प्रवेश केला आणि इथून सुरू झाला त्यांचा गुन्हेगारीचा प्रवास…

काही काळ परेल , चिंचपोकळी , भायखळा आणि कॉटन ग्रीनच्या गिरण्यांमध्ये त्यांनी गिरणी कामगार म्हणूनही काम केलं. १९८६ साली त्यांनी पहिल्यांदा केलेल्या हत्यामुळे त्यांना अटक झाली. गुंड पारसनाथ पांडे आणि कोब्रा गॅंगचा साशी रासम यांचा खून केल्याप्रकरणी अरुण गवळी पहिल्यांदा तुरुंगात गेला. तेव्हापासून अरुण गवळी हे नाव वरच चर्चेत राहिला.

आपल्या भावाची हत्या केली या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याने दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरची १९९१ साली हत्या केली. १९९० च्या दशकामध्ये अरुण गवळी पोळीसाठी मोठी डोकेदुखी ठरला होता. त्यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे टाडा लावण्यात आला आणि मग त्यांना नऊ वर्ष तुरुंगवा सहन करावा लागला.

तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी जनमानसामध्ये इतकी प्रसिद्ध मिळवली होती, इतका विश्वास संपादित केला होता की, त्यांनी १९९७ साली अखिल भारतीय सेनेची स्थापना केली आणि २००४ च्या निवडणुकीमध्ये ते आमदार म्हणूनही निवडून आले. त्यांची बायको आशा गवळी, दोन मुलं महेशा आणि गीता या कुटुंबामध्ये बायको आणि मग मुलगी राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वावर प्रेरित होऊन किंवा काही चित्रपटांमधून त्यांच्या जीवनातल्या अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.

राम गोपाल वर्माच्या शिवा सिनेमात अरुण गवळीच्या व्यक्तिरेवर प्रेरित होऊन उपेंद्र लिमयेने एक भूमिका साकारली होती. त्यानंतर मराठी चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ हा सिनेमा आला. ज्यात त्यांच्याच भूमिकेने प्रेरणा घेऊन मकरंद देशपांडे यांच्या भूमिकेत दिसले आणि आता अरुण गवळी यांच्यावर आधारित डॅडी हा एक हिंदी सिनेमा २०१७ साली प्रदर्शित झाला होता. यात अर्जुन रामपाल यांनी डॅडींची व्यक्तिरेखा साकारली होती.

एका दूध विक्रेत्यापासून , समाजसेवा , गुन्हेगार आणि राजकारणी होण्यापर्यंतचा यांचा प्रवास आपल्याला थक्क करणारा आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला अरुण गवळी यांची माहिती , arun gawali information in marathi , अरुण गवळी जीवनचरित्र , arun gawali marathi mahiti , arun gawali yanchi mahiti  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment