सिंधुताई संपकाळ मराठी माहिती | sindhutai sapkal information in marathi

सिंधुताई संपकाळ मराठी माहिती | sindhutai sapkal information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सिंधुताई संपकाळ यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही सिंधुताई संपकाळ मराठी माहिती , sindhutai sapkal information in marathi , sindhutai sapkal marathi mahiti याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्यातील एका छोट्याश्या खेड्यात झाला. त्या एवढ्या गरीब होत्या की , त्यांचा जन्म एका गोठ्यात झाला. त्यांच्या सख्ख्या आईला सिंधुताईबद्दल तिरस्कार होता. म्हणून त्यांनी तिचे नाव चिंधी (चिंधी म्हणजे कपड्यचा फाटलेला तुकडा , ज्याचे काही महत्व नाही असे) ठेवले होते. सिंधुताईंच्या वडिलांना त्या अतिशय प्रिय होत्या. त्यांच्या आईच्या इच्छे विरुद्ध जाऊन त्यांना तिला शिकवायचे होते. त्यांचे कुटूंब अतिशय गरीब होते. कौटुंबिक जबाबदाऱ्या , अत्यंत गरिबी आणि लवकर झालेलं लग्न यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण सोडावे लागले.

सिंधुताई संपकाळ यांच्या वडिलांचे नाव अभिमान साठे असे होते. ते गुरें वळायचे काम करीत असे. सिंधुताई यांना घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. त्यांचे गाव लहान होते पण तरीही त्यांनी ४थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.

सिंधुताई संपकाळ अनाथांची माय

सिंधुताई यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सिंधुताई यांचे जीवन खूप कष्ठाचे गेले त्यांना खूप हाल आणि अपेष्टा सहन कराव्या लागल्या. सिंधुताई संपकाळ “अनाथांची माय ” या नावाने जगभर ओळखल्या जातात.

जगण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी सिंधूताईंना रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर भीक मागायला लागले. अनेक दिवसरात्र त्यांनी स्मशान भूमी मध्ये काढली, त्यांची अवस्था इतकी बिकट झाली होती की, लोक त्यांना स्मशान भूमीमध्ये भूत समजू लागली. काही महिन्यानंतर त्यांनी आपल्या आईकडे परत जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्या आईने त्यांना घरी घेण्यास नकार दिला. त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, पण त्यांनी भीक मागणे स्वीकारले.

रस्त्यावर राहताना त्यांच्याशी लक्षात आले की, अनेक पालकांनी त्यांच्या मुलांचे पालकत्व सोडले आहे. अशा अनाथ मुलांना सिंधुताईंनी दत्तक घेतले आणि त्यांचे संगोपन केले. अशा सर्व मुलांना उपाशी न ठेवण्याचे हेतूने त्यांनी आणखी भीक मागण्यास सुरुवात केली. जी जी मुले त्यांना अनाथ म्हणून भेटली त्या सर्वांचे मातृत्व त्यांनी स्वीकारले. त्यांनी आपली स्वतःची मुलगी दगडूशेठ श्रीमंत हलवाई ट्रस्टला दान करण्याची ठरवले होते, कारण त्यांना आपल्या पोटच्या मुलीमध्ये आणि अनाथ मुलामध्ये कोणताही भेदभाव निर्माण करायचा नव्हता.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वाहून घेतले. म्हणून सर्व जण तिला प्रेमाने माई (आई) म्हणतात. सिंधुताईंनी हजारो मुला मुलींचे पालनपोषण केले. त्यांनी दत्तक घेतलेल्या जावई ,सून आणि नातवंडे यांची संख्या १०० पेक्षा अधिक आहे.

त्यांनी दत्तक घेतलेले कित्येक मुले सुशिक्षित म्हणजेच डॉक्टर , इंजिनिअर , वकील आहेत. तसेच कित्येक क्षेत्रामध्ये आपले नाव कमवत आहेत. सिंधुताईंना २०० पेक्षा अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधुताईंना मिळालेली पुरस्काराची रक्कम त्यांनी अनाथ मुलांसाठी खर्च केली आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” हा मराठी चित्रपट २०१० साली मराठी भाषेमध्ये प्रदर्शित झाला होतं. या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर ५४ व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता.

ममता बाल सदन संस्था

अनाथ मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन व्हावे तसेच उत्तम शिक्षण मिळावे , या उद्देशाने त्यांनी १९९४ साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या खेडेगावात ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. ही संस्था मुलांचे पालनपोषण करण्यापासून ती स्वावलंबी होण्यावर भर दिला जातो. त्यांनतर योग्य तो जोडीदार शोधून त्यांच्या विवाहांचे देखील आयोजन करण्यात येते. आता पर्यंत या सदन मधून हजारो मुले आपल्या पायावर उभी राहली आहेत.

सिंधुताई संपकाळ यांचा मृत्यू

सिंधुताई संपकाळ यांचा मृत्यू दि ०४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यावेळी त्या ७४ वर्षांच्या होत्या. मृत्यूपूर्वी त्यांचे एक महिनाअगोदर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.

सिंधुताईंनी खालीलपैकी संस्था सुद्धा स्थापन केल्या आहेत.

  • सन्मती बाल निकेतन, भेल्हेकर वस्ती, हडपसर, पुणे
  • ममता बाल सदन, कुंभारवळण, सासवड
  • माईंचा आश्रम चिखलदरा, अमरावती
  • अभिमान बालभवन, वर्धा
  • गंगाधरबाबा छात्रालय, गुहा
  • सप्तसिंधु’ महिला आधार, बालसंगोपन आणी शिक्षण संस्था, पुणे

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सिंधुताई संपकाळ मराठी माहिती , sindhutai sapkal information in marathi , sindhutai sapkal marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment