पुरणपोळी रेसिपी | puran poli recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण पुरणपोळी रेसिपी ( puran poli recipe in marathi ) दिली आहे. पुरणपोळी रेसिपी , puran poli recipe, puran poli recipe in marathi ,puran poli in marathi , puran poli with sugar recipe ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

पुरणपोळी रेसिपी | puran poli recipe in marathi

पुरणपोळी रेसिपी साहित्य | puran poli recipe ingredients in marathi

१) १/२ किलो हरभरा डाळ

२) १/२ किलो गूळ (पण थोडा कमी) १०० ग्रॅम कमी

३) १/२ टी-स्पून वेलची पावडर

४) १/२ जायफळ पावडर, केशर

५) १/४ टी-स्पून मीठ

पुरणपोळी कव्हरसाठी

१) ३ वाट्या कणीक मैद्याच्या चाळणीने चाळून १/२ वाटी मैदा

२) १/४ टी-स्पून मीठ

३) कणकेत घालण्यासाठी १ वाटी तेल

४) १ वाटी तांदळाचे पीठ पोळीला लावण्यासाठी

५) दूध २ वाट्या किंवा जरुरीनुसार

पुरणपोळी रेसिपी कृती :

कव्हरसाठी

१) कणीक, मैदा, मीठ व तेल टाकून दुधात सैलसर भिजवा. कोल्हापूर साईडला ही कणीक पाट्यावर ठेवून मुसळाने तेल, पाणी लावून कुटून घेतात. ही कुटायला २ माणसे लागतात.

एकाने खाली बसून कणकेला तेल, पाणी लावायचे व उभी असलेल्या बाईने फक्त मुसळ धरून कुटायला मदत करायची. (हे मुसळ लाकडापासून बनवतात.)

हे काम आपण खलबत्ता किंवा वरवंट्याने करू शकतो किंवा आज तर फुडप्रोसेसर आहेच. कुटल्याने पीठ मऊ होते व पोळी छान होते. मी तर छोट्या पितळेच्या किंवा स्टीलच्या बत्त्याने परातीतच पीठ कुटते.

पुरणासाठी

१) हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्या. मोठ्या पातेल्यात गरम पाणी करून गॅसवरच ठेवा व त्यात धुतलेली डाळ टाकून शिजायला ठेवा. पाण्याला चांगली उकळी आल्यावर गॅस मंद करून अर्धवट झाकण ठेवा; कारण उतू जाण्याची शक्यता असते. डाळ कुकरमध्येही शिजवू शकता.

२) डाळ शिजल्यावर गॅस बंद करा व स्टीलच्या चाळणीवाली एक पातेले ठेवून चाळणीत डाळ टाकून पाणी काढून घ्या. या पाण्याची आमटी करावी. त्यालाच कटाची आमटी म्हणतात.

डाळीतले पाणी निघून कोरडी झाल्यावर त्यात किसलेला गूळ टाकून मिश्रण कढईत टाकून गॅसवर शिजायला ठेवा. पुरणाचा खमंग वास येईल व कडेने कोरडे झाले की पुरण शिजले असे समजा. गॅस बंद करा. पुरणात १/४ टी-स्पून मीठ टाका.

४) गरम गरम पुरण पुरणयंत्रातून पटपट काढा. कारण पुरण थंड झाल्यावर पुरणयंत्रातून काढायला अवघड होते. तयार पुरणात वेलची पावडर, जायफळ व केशर टाका व हलवून घ्या. 

५) मळलेल्या कणकेत १/२ वाटी तेल घालून परत मळून घ्या. 

६) कणकेचा लहान गोळा घेऊन त्यात त्याच्या तिप्पट पुरण भरून उंडा करा व तांदळाचे पीठ लावून पोळी लाटा.

७) गरम तवा करून पोळ्या भाजा व भाजल्यावर खाली उतरून तूप लावा. ( कोल्हापूर भागात तवा उलटा ठेवून पोळी भाजतात. त्यामुळे पोळी आपोआप लांबली जाते. पोळी बदामी रंगावर भाजावी. )

स्पेशल साखरेची पुरणपोळी | puran poli with sugar recipe

स्पेशल साखरेची पुरणपोळी साहित्य | puran poli with sugar recipe ingredients

१) १/२ किलो डाळ

२) १/२ किलो साखर (५० ग्रॅम कमी)

३) साधारण १/२ किलो मैदा

४) वेलची, जायफळ केशर (गुळाच्या पुरणपोळीप्रमाणेच)

५) २ वाटी तेल

६) मीठ चवीनुसार

७) दूध (मैदा भिजविण्यासाठी)

पुरणपोळी रेसिपी कृती :

१) मैदा पूर्ण दुधात मीठ टाकून सैलसर भिजवा. २) हरभरा डाळ पूर्ण शिजवून त्याचे पाणी (कट) आमटीसाठी काढून बाजूला ठेवा. शिजलेल्या डाळीत साखर १/४ चमचा मीठ टाकून शिजवा. पुरणयंत्रातून पुरण काढा. त्यात वेलची, जायफळ केशर टाका.

३) मळलेल्या मैद्यात १ वाटी तेल टाकून मळून घ्या व परातीतच बत्त्याने कुटून घ्या. मळून घ्या व उरलेले १ वाटी तेल टाकून मैदा झाकून ठेवा. तेलात पीठ बुडवून ठेवा. त्यामुळे पोळ्या खुसखुशीत होतात. १/२ तासाने पुरणपोळ्या करा. भाजून घ्या. नंतर लावा. तूप

टीप: मैदा भिजवतानाच सैलसर भिजवा, कारण घट्ट मळलेला मैदा सैल करण्यास कठीण पडते. म्हणून प्रथमच मैदा सैलसर भिजवा.

धन्यवाद खवय्यांनो. जर आपल्याला पुरणपोळी रेसिपी , puran poli recipe, puran poli recipe in marathi ,puran poli in marathi , puran poli with sugar recipe हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment