मिसळ रेसिपी | misal pav recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मिसळ रेसिपी ( misal pav recipe in marathi ) दिली आहे.  मिसळ रेसिपी , misal pav recipe in marathi , misal pav, misal pav recipe , misal recipe  ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा. 

मिसळ रेसिपी | misal pav recipe in marathi

मिसळ रेसिपी साहित्य | misal pav recipe ingredients in marathi

१) २ वाट्या मोड आलेली मटकी

२) ३ बटाटे (उकडलेले)

३) ४ कांदे

४) १ वाटी खवलेले खोबरे

५) २ चमचे गरम मसाला

६) ३ चमचे लालतिखट, हळद

७) शेव, चिवडा

८) आवडीप्रमाणे थोडा गूळ

९) तेल

१०) कोथिंबीर, ओलं खोबरे 

लिंबू मिसळीच्या कटाचे साहित्य :

१) २ कांदे मोठे

२) ७-८ पाकळ्या लसूण, आलं १ तुकडा

३) १/२ वाटी सुकं खोबरं किसलेले

४) १/२ चमचा जिरे, ४-५ मिरी

५) ४ चमचे तिखट

६) १/२ वाटी तेल

७) १ चमचा तीळ

मिसळ रेसिपी कृती | misal pav recipe steps in Marathi

१) मोठ्या पातेल्यात १/२ वाटी तेल टाकून, त्यात चिरलेले २ कांदे टाकून परता. त्यात मटकी, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे गरममसाला ओलं खोबरं, तिखट, मीठ, हळद टाकून पाणी टाकून शिजवून घ्या. शिजवल्यावर मूळ कोथिंबीर टाका. ही उसळ करून ठेवा.

२) कटासाठी कांदा-खोबरं चिरून घ्या. उरलेले २ कांदे मिसळीवर टाकण्यासाठी चिरून ठेवा. 

३) जीरे, तीळ, मिरी भाजून घ्या.

४) कांदा, खोबरं, आलं-लसूण, तीळ, जिरे-मिरी हे मिक्सरवर पेस्ट करा.

५) १/२ वाटी तेल कढईत टाकून फोडणी करा. वाटलेली पेस्ट टाकून परतून घ्या. त्यात तिखट टाका. ४-५ वाट्या पाणी टाका. उकळी येऊ द्या. हा कट गरमच असावा लागतो. तरच त्याची मजा.

६) शेव, चिवडा, कांदा, कोथिंबीर ओलं खोबरं एकत्र करून ठेवा.

७) प्रथम मटकीची उसळ डिशमध्ये ठेवा. त्यावर लिंबू पिळा. त्यावर शेव, चिवडा, कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं टाका. त्यानंतर त्यात गरम कट टाकून ब्रेडबरोबर गरमागरम मिसळ सर्व्ह करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला मिसळ रेसिपी , misal pav recipe in marathi , misal pav, misal pav recipe , misal recipe  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment