अहिल्याबाई होळकर | ahilyabai holkar information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही अहिल्याबाई होळकर , ahilyabai holkar information in marathi , devi ahilya bai holkar , अहिल्याबाई होळकर यांची माहिती , अहिल्याबाई होळकर भाषण , अहिल्याबाई होळकर निबंध याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

अहिल्याबाई होळकर | ahilyabai holkar information in marathi

राजमाता जिजाऊ , महाराणी येसूबाई , महाराणी ताराबाई , झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांसारख्या स्त्रियांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले. महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

यांच्या बरोबरीने आणखीही एक नाव घ्यावेसे वाटते ते नाव आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे.

अहिल्याबाई होळकर जयंती

आजच्या या लेखामध्ये राजमाता अहिल्याबाईंचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत. दिनांक ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी शिंदे घराण्यात त्यांचा जन्म झाला.

अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते. मराठ्यांचे पराक्रमी सेनानी मल्हारराव होळकर स्वारीवर असताना एक त्यांच्या नजरेत आलेल्या मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या अंगी असलेले गुण पाहून त्यांना आपल्या सुनबाई करण्याचे त्यांच्या मनात आले. त्यानुसार त्यांनी त्यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला.

विरुद्ध लढताना तोफेचा गोळा लागून अहिल्याबाईंचे पती खंडेराव ठार झाले. अहिल्याबाईंना हे समजतात त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. आपल्या पतीच्या मागे राहून पण जगण्यात काहीच अर्थ नाही, असा विचार करणाऱ्या अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. आधीच मुलगा गेल्याच्या दुःखात असलेल्या मल्हाररावांना अहिल्याबाईंचा हा निर्णयसमजताच त्यांचे मन सुन्न झाले.

पण तरीही स्वतःला सावरून मोठ्या मनाने सती जाण्याचा हट्ट करून बसलेल्या अहिल्याबाईंना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न मल्हारराव करू लागले आणि त्यात त्यांना यशही आले.

अहिल्याबाई होळकर यांचे कार्य

अहिल्याबाईंना शिक्षणाचे बाळकडू मिळालेच होते, मल्हार रावांनी अहिल्याबाईंना लष्करी आणि मुलकी कारभाराचे कामकाज शिकवले. अहिल्याबाई सुद्धा या कामकाजात पारंगत होत्या. अहिल्याबाईंची एकंदर काम करण्याची पद्धत पाहून अहिल्याबाई मुलकी आणि लष्करी कारभार यशस्वीपणे सांभाळू शकते असा विश्वास मल्हाररावांना होता.

अहिल्याबाईंनी मल्हाररावांचा हा विश्वास सार्थही करून दाखवला. मल्हारराव सतत स्वाऱ्यांवर असायचे त्यावेळी त्यांना रसतपुरवठा करण्याचे काम, नवीन सैन्य भरती करणे, मुलुखीं कारभार यशस्वीपणे हाताळून अहिल्याबाईंनी त्यांची कर्तबगारी सिद्ध केली. अहिल्याबाईंवर पूर्व माळव्यातील दोन जिल्ह्यांमधील कारभाराची घडी नीट बसवण्याचे काम मल्हाररावांनी सोपवले होते आणि अहिल्याबाईंनी हे काम चोखपणे पार पाडले.

पती खंडेराव गेल्याचे दुःख अजूनही अहिल्याबाईंच्या मनातून गेले नव्हते, तोच काळाने त्यांच्यावर दुसरा आघात केला होळकरांच्या घरात आल्यापासून वडिलांप्रमाणे माया करणारे आणि मोठा आधार असणारे मल्हारराव काळाने अहिल्याबाईंपासून हिरावून नेले. हे दुःख कमी होते की काय म्हणून पुढच्या काहीच वर्षात अहिल्याबाईंचा लाडका मुलगा मालेगाव यांनाही काळाने हिरावले.

अशा अनेक दुःखी आणि कठीण परिस्थितीथीमध्ये इंदोर होऊन कारभार पाहणे, अहिल्याबाईंना कठीण जात होते. म्हणून त्यांनी त्यांची राजधानी महेश्वर येथे हलवली. आता मात्र दुःख बाजूला सारून अहिल्याबाईंनी त्यांची सर्व लक्ष मुलुखीं कारभारावर आणि मुख्य म्हणजे माळव्यातील होळकरांचा प्रदेश सुखी आणि समृद्ध कसा होईल याकडे केंद्रित केले.

उत्तर आणि दक्षिण भारतात त्यावेळी सतत लढाया सुरू होत्या. पण जोपर्यंत माळव्याचा कारभार अहिल्याबाई पहात होत्या तोपर्यंत होळकरांच्या राज्यावर कोणत्याही शत्रूंनी हल्ला करण्याचा विचार केला नाही. यावरून अहिल्याबाईंच्या मुसुद्दीगिरीची आणि चोख कारभाराची कल्पना येते.

अहिल्याबाईंचे समाजकार्य / समाजसेवा | ahilyabai holkar social work

अहिल्याबाईंची न्याय व्यवस्था चोख होती. न्यायनिपक्ष आणि शिक्षक कठोर होती. अहिल्याबाईंनी माळव्यामधील आणि माळव्याबाहेर लोकांना उपयोगी पडतील अशी कामे केली होती. माळव्याप्रमाणे वाराणसी, द्वारका, गया, रामेश्वर यांसारख्या तीर्थस्थळांमध्ये बांधलेली देवळे, नद्यांवरील घाट, धर्मशाळा पाण्याचे हौद, विहिरी, अन्नछत्रे अशी अनेक कामे अहिल्याबाईंनी केली. यापैकी अनेक वास्तू आजही आपल्याला मोठेपणाची साक्ष देत उभ्या आहेत.

अहिल्याबाईंनी विशेष प्रयत्न करून गोरगरिबासाठी अशा सोयीसुविधा करून दिल्यामुळेच सर्वसामान्य जनता अहिल्याबाईंना राजमाता, लोकमाता ,देवी अशी विशेषणे लावून अहिल्याबाई विषयी आदर व्यक्त करते.

अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी

पती खंडेराव, पराक्रमी सासरे मल्हाररावांच्या पाठीमागे जवळपास तीस वर्षे होळकरांची दौलत अहिल्याबाईंनी सांभाळली. अशा कर्तव्यनिष्ठ , धर्मनिरपेक्ष , चारित्र्यशील , प्रजावत्सल, न्यायी अशा अहिल्याबाईंचा मृत्यू दिनांक १३ ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वरी येथे झाला. अहिल्याबाईची समाधी मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील किल्ले महेश्वर या ठिकाणी आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला अहिल्याबाई होळकर , ahilyabai holkar information in marathi , devi ahilya bai holkar , अहिल्याबाई होळकर यांची माहिती , अहिल्याबाई होळकर भाषण , अहिल्याबाई होळकर निबंध हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “अहिल्याबाई होळकर | ahilyabai holkar information in marathi”

Leave a Comment