माझी सहल निबंध मराठी | mazi sahal essay in marathi | my picnic essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सहलीचे वर्णन केले आहे. ही माहिती तुम्ही माझी सहल निबंध मराठी , my picnic essay in marathi , माझ्या शाळेची सहल निबंध मराठी , mazi sahal marathi nibandh, mazi sahal essay in marathi, आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

माझी सहल निबंध मराठी | mazi sahal essay in marathi | my picnic essay in marathi

नुकतेच आमच्या परीक्षा संपल्या होत्या. कित्येक सलग दिवस अभ्यास करून कंटाळा आला होता. तितक्यात गुरुजी आमच्या वर्गात आले आणि त्यांनी सांगितले की उद्या तुमची सहल महाबळेश्वर येथे जाणार आहे. ही बातमी ऐकताच सर्व विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये जल्लोष साजरा केला.

कधी एकदा शाळा सुटते आणि मी बॅग भरायला सुरुवात करतोय याची काहूर माझ्या मनाला लागली. शेवटचा तास संपताच शाळेची घंटा वाजली. मी मोठ्या आनंदाने शाळेची बॅग घेऊन घरापर्यंत परत पळत सुटलो.

सहलीची तयारी

मी घरी आईबाबांना शाळेचा सहलीबद्दल सांगितलं, त्यांनी मला सहली ची फी आणि इतर खर्चासाठी हजार रुपये दिले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी सर्व साहित्याची एका वहीत नोंद करून बॅग भरायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आम्हाला सरांनी सकाळी सहा वाजता हजर राहण्यास सांगितले होते म्हणून मी सर्व तयारी करून लवकर झोपलो होतो. मी एकदम पुढच्या आसनावर जाऊन बसलो जेणेकरून मला थोडा फार का होईना बसमधून  रस्ता दिसेल आणि प्रवासाचा आनंद घेता येईल.

महाबळेश्वरकडे आगेकूच

बसमध्ये आम्ही गाण्याच्या भेंड्या आणि अंताक्षरी खेळायला लागलो. माझ्या लक्षात आलेली तीन-चार गाणी मी सहज म्हटली. गुरुजी आणि बाईंनी सुद्धा त्यांच्या जमान्यातील जुनी गाणी म्हणून आमच्याबरोबर सहभाग दर्शवला. शेवटी गाण्यांच्या भेंड्या मध्ये आमची टीम विजयी झाली.सकाळी लवकर उठल्यामुळे सर्वांना जोरात भूक लागलेली होती म्हणून आम्ही नाश्ता ची वाट पाहत होतो. तेवढ्यात सरांनी कांदेपोहे सर्वांना वाटण्यास सुरुवात केली आणि आम्ही पण त्यांना मदत करू लागलो. पुढच्या दहा मिनिटात आम्ही सर्वांनी कांदेपोहे फस्त केले.

पाचगणी

त्यानंतर आम्ही अंताक्षरीला पण सुरुवात केली. जवळपास दोन तासानंतर आमची बस पाचगणी येथे पोहोचली. तिथल्या उंचच उंच डोंगरदऱ्यांनी आणि हिरव्यागार नटलेल्या वटवृक्ष आणि आमचे डोळे क्षणार्धात दीपावली होते. सरांनी आम्हाला पाचगणी बद्दल माहिती सांगितली. दांडेघर , गोदवली,  आम्ब्रल, खिंगर आणि तायघाट या पाच गावांच्या मधली जमीन म्हणून या जागेची पाचगणी हे नाव ठेवण्यात आले आहे. पाचगणी ब्रिटिशकाळापासून विश्रांतीसाठी तसेच निवृत्तीनंतरचा वेळ व्यतीत करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

प्रतापगड

पाचगणी सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे तिथली हवेची झुळूक आम्हा सर्वांना आल्हाददायी वाटणारी होती. पाचगणी नंतरचा आमचा पुढचा थांबा होता प्रतापगड. प्रतापगडचे नाव ऐकताच महाराजांच्या पोवाड्याची एक ओळ माझ्या मनात पुटपुटत होती ती म्हणजे “प्रतापगडच्या पायथ्याशी खान”. होय हाच तो प्रतापगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची बोटे छाटली होती.

गडाच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत आम्ही सर्वजण खूप थकून गेलो होतो. गडाची मोडकळीस आलेली अवस्था पाहून मनाला खूप दुःख झाले. इतिहासाच्या बाईनी प्रतापगडाची सुंदर अशी माहिती आम्हा सर्वांना सांगितली. आपल्या देशाचे स्वच्छतेचे धोरण पाहता आम्ही प्रतापगड स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे जणू आम्ही महाराजांचे मावळे आहोत आणि त्यांनी आम्हाला गड स्वच्छ करायला सांगितले आहे असे वाटले. सरांनी लावलेल्या शिस्तीने एका ओळीमध्ये चालत आम्ही सर्व विद्यार्थी गड उतरलो.

वेन्ना तलाव

दिवसभर फिरून आम्हा सर्वांना खूप भूक लागली होती आणि भरपूर थकलो सुद्धा होतो. म्हणून आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहे जेवणावर ताव मारला. हॉटेलमधल्या जेवणातील सर्व पदार्थ अतिशय रुचकर आणि चविष्ट होते. जेवणानंतर सरांनी सर्वांना विश्रांती करण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वेन्ना तलावाकडे वळवला. तलावाची सफर करण्यासाठी खास पर्यटकांसाठी होडीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्हाला होडीची सफर नाकारण्यात आली. तलावाचे विहंगमय दृश्य डोळे दिपवणारे होते तसेच मनाला शांती देणारे होते.

संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काळोख पडण्यास सुरुवात झाली होती. म्हणून आम्ही हॉटेलवर परत जायचा निर्णय घेतला. हॉटेलवर आम्ही कॅरम, चोर-पोलीस, बुद्धीबळ, टेबल टेनिस अशा अनेक प्रकारचे बैठे खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणाची वेळ कधी झाली हे आम्हाला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठता यावे म्हणून आम्ही लवकर जेवून झोपून गेलो.

सकाळ झाल्यावर आम्हाला सुंदर अश्या पक्षांचे किलबिलाट ऐकावयास मिळाले. पुढच्या प्रवासासाठी आम्ही सर्व जण तयार झालो.

लिंगमळा धबधबा

दुसऱ्या दिवसाच्या सकाळी आम्ही लिंगमळा धबधबा साठी निघालो. धबधब्याकडे जाताना निसर्गाने जणू हिरवीगार चादर अंगावर घेतली आहे असे भासू लागले. हाच लिंगमाला धबधबा पुढे वेन्ना तलावामध्ये जाऊन मिळतो. सहाशे फुटावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा रंग अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र होता. रस्त्यावरून जाणारी वाहने देखील कासवाच्या गतीने चालत होती कारण धुक्याचे चादर सर्वत्र पसरले होते. असे हे मनमोहक दृश्य स्वर्गाची अनुभूती देत होते.

विल्सन पॉईंट

त्यानंतर आम्ही महाबळेश्वर मधील सर्वात उंच अशा ओळखल्या जाणाऱ्या विल्सन पॉईंट या ठिकाणी पोहोचलो. हा महाबळेश्वर मधील असा पॉईंट आहे जिथे सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणावरून पाहता येतात.

अशी ही आमची दोन दिवसांची सहल माझ्या मनात आयुष्यभर घर करून राहिल. मे महिन्यामधील उन्हाळ्याच्या सुट्टीची उणीव या सहलीने दोन दिवसात भरून काढली होती. तसेच सहली दरम्यान आमच्या शिक्षकांनी घेतलेल्या काळजी बद्दल व दिलेल्या ज्ञानाबद्दल मी नेहमीच त्यांचा ऋणी राहीन. या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव माझ्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी खरच महत्वाचे ठरतील.

सहलीचे सर्व क्षण मी माझ्या मनाच्या कॅमेरामध्ये टिपून ठेवले होते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला माझी सहल निबंध मराठी , my picnic essay in marathi , माझ्या शाळेची सहल निबंध मराठी , mazi sahal marathi nibandh, mazi sahal essay in marathi, आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment