मटण बिर्याणी रेसिपी | mutton biryani recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मटण बिर्याणी रेसिपी ( mutton biryani recipe in Marathi )  दिली आहे.  मटन बिर्याणी ,मटन बिर्याणी दाखवा , दम बिर्याणी रेसिपी , मटन बिर्याणी , mutton biryani recipe in Marathi , 1 kg mutton biryani recipe in Marathi ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

मटण बिर्याणी रेसिपी | mutton biryani recipe in Marathi – भाग १

मटण बिर्याणी रेसिपी ( mutton biryani recipe in Marathi )

१) १ किलो मटण

२) १/२ किलो बासमती तांदूळ

३) २ कांदे उभे कापलेले

४) १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट

५) ४ हिरव्या मिरच्या उभ्या कापून

६) १ वाटी दही

७) १ टी-स्पून गरम मसाला पावडर

८) २ टी-स्पून मिरची पावडर

९) २ तमालपत्रे, ४-५ वेलदोडे, ४-५ दालचिनी, ४-५ मिरी, ४-५ लवंग, १ टी-स्पून शहाजिरे

१०) १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर

११) ४ टी-स्पून धणे पावडर

१२) १ टेबलस्पून बेदाणे

१३) १ वाटी काजू

१४) ३/४ टी-स्पून केशरी रंग

१५) ४ टी-स्पून डालडा तूप

१६) २ टेबलस्पून साजूक तूप

१७) १ वाटी तेल

१८) १/२ वाटी खवा

१९) १ वाटी भिजवलेली कणीक

२०) २ वाट्या कुरकुरीत तळलेला कांदा

२१) २ टोमॅटो, १ लिंबू

२२) ४ उकडलेली अंडी

मटण बिर्याणी रेसिपी कृती ( mutton biryani recipe steps in Marathi )

१) मटण स्वच्छ धुवून त्याला धणे पावडर, गरममसाला पावडर, मिरची पावडर, आलंलसूण पेस्ट, दही, चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरून, १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्या. ते २ तास ठेवा.

२) एका पातेल्यात १ वाटी तेल घालून त्यात तमालपत्र चिरलेला कांदा टाका. गुलाबी झाल्यावर त्यात मुरलेले मटण टाका. मटणाला पाणी सुटेल. पातेल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर मटण शिजू द्या. मटण शिजल्यावर त्यात तळलेला कांदा कुस्करून टाका. काजू बेदाणे टाका.

३) दुसऱ्या पातेल्यात ४ टी-स्पून डालडा तूप टाका. त्यात लवंग, दालचिनी, मिरी, शहाजिरे टाका. खवा तांदूळ टाकून गरम पाणी टाका. मीठ टाका. भात मोकळा शिजू द्या.

४) शिजलेल्या मटणावर भात टाकून घ्या. भात पसरून लावा. झाऱ्याने ४-५ बिळे करा. त्यात दुधात केशरी रंग कालवून चमच्याने सोडा, तळलेला कांदा, तळलेले काजू पसरून घाला. साजूक तूप कडेने सोडा, उकडलेली अंडी अर्धी कापून ठेवा. पातेल्याला कडेने कणीक लावा व त्यावर झाकण ठेवा. मंद गॅसवर एक वाफ येऊ द्या. गॅस बंद करा.

मटण बिर्याणी रेसिपी | mutton biryani recipe in Marathi – भाग २

मटण बिर्याणी रेसिपी ( mutton biryani recipe in Marathi )

१) १ किलो मटण

१/२ किलो बासमती तांदूळ

३) १ टेबलस्पून आलंलसूण पेस्ट

४) ८ लवंगा, ४ दालचिनी तुकडे, १ तमालपत्र, १४ मसाला वेलदोडे, ३ लहान वेलदोडे

५) २ टेबलस्पून साजूक तूप, केशरदुधात मिक्स करून.

६) १/२ वाटी तळलेले काजू, १/२ वाटी खवा

मटण बिर्याणी रेसिपी कृती ( mutton biryani recipe steps in Marathi )मटणासाठी

१) १ टीस्पून आलंलसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट

२) २ वाट्या दही

३) १ वाटी तेल

४) १ वाटी तूपात तळलेला कांदा

५) १ टेबलस्पून गरम मसाला पावडर

६) १ वाटी कापलेला कांदा

७) १ टेबलस्पून गरम मसाला पावडर

८) १ टेबलस्पून कोल्हापुरी कांदामसाला

९) ४-५ लवंगा, ४ दालचिनी तुकडे, ४ वेलच्या, २ मिरी

१०) २ टी-स्पून तिखट

मटण बिर्याणी रेसिपी कृती ( mutton biryani recipe steps in Marathi )

१) मटणाला दही, आलंलसूण, कोथिंबीर, धणेजिरे पावडर, तिखट गरम मसाला पावडर, तळलेला कांदा, लवंग दालचिनी, वेलदोडे, मिरी, मीठ लावून १ तास ठेवा व कुकरमध्ये टाकून मटण शिजवून घ्या. भात करण्यापूर्वी तांदूळ १ तास धुवून ठेवा.

२) पातेल्यात साजूक तूप टाकून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र मसाला, वेलदोडे, साधे वेलदोडे टाकून तांदूळ टाका व परतून घ्या. त्यात मीठ व गरम पाणी टाकून भात शिजायला ठेवा. खवा कुस्करून टाका व मोकळा भात शिजवून घ्या.

३) कढईत तेल टाकून थोडा कांदा परतून घ्या. त्यात शिजलेले मटण, तिखट, तळलेले काजू टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता. गॅस बंद करा. आता बिर्याणी लावायला घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात प्रथम तूप टाकून घ्या. त्यावर परतलेले मटण टाका. पसरून घ्या. त्यावर तयार केलेल्या भाताचा थर द्या.

४) थोडा तळलेला कांदा व तळलेले काजू, केशर दूध घालून शिंपडा. तूप टाका व पातेल्यात कणीक लावून झाकण ठेवा व मंद गॅसवर बिर्याणीचा वास आल्यावर गॅस बंद करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला मटन बिर्याणी ,मटन बिर्याणी दाखवा , दम बिर्याणी रेसिपी , मटन बिर्याणी , mutton biryani recipe in Marathi , 1 kg mutton biryani recipe in Marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment