खिमा पॅटीस रेसिपी | keema patties recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण खिमा पॅटीस रेसिपी ( keema patties recipe in Marathi )  दिली आहे.  खिमा पॅटीस , keema patties recipe in Marathi , खिमा पॅटीस रेसिपी ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.  

खिमा पॅटीस रेसिपी | keema patties recipe in Marathi

खिमा पॅटीस रेसिपी साहित्य ( keema patties recipe ingredients in Marathi )

 • १/४ किलो खिमा (मटण खिमा)
 • ६ मोठे बटाटे उकडलेले
 • २ टेबलस्पून डाळीचे पीठ
 • मीठ, मिरी पावडर चवीनुसार
 • १ टी स्पून गरम मसाला पावडर
 • १ टेबलस्पून लिंबाचा रस
 • १ टेबलस्पून आलं लसूण, मिरची पेस्ट
 • १ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली
 • रवा किंवा ब्रेडक्रम्स
 • तळण्यासाठी तेल
 • अंडे

खिमा पॅटीस रेसिपी कृती ( keema patties recipe steps in Marathi )

१) प्रथम खिमा कुकरमध्ये मीठ टाकून शिजवा व खलबत्त्यात कुटून घ्या म्हणजे एकजीव होईल. कढईत १/२ टेबलस्पून तेल टाका.

२) आलं लसूण मिरची पेस्ट टाकून परतून घ्या. त्यात खिमा, गरम मसाला पावडर, कोथिंबीर टाकून परता. त्यात लिंबाचा रस घाला व गॅस बंद करा. त्याचे एकसारखे गोळे करून ठेवा.

३) उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात मीठ व मिरपूड टाका व त्याचा गोळा बनवून घ्या. त्याचे सारखे गोळे करून त्याची पारी करा. त्या पारीत खिमा भरून त्यास पाहिजे तसा आकार द्या. (लांबट किंवा गोल).

४) अंडे फोडून फेसून घ्या. त्यात तयार पॅटीस बुडवून रव्यात किंवा ब्रेडक्रम्समध्ये बुडवून फ्राय पॅनमधे शॅलो फ्राय करा.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला खिमा पॅटीस , keema patties recipe in Marathi , खिमा पॅटीस रेसिपी हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment