धनत्रयोदशी कथा । धनत्रयोदशीची माहिती | dhantrayodashi information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये नरक चतुर्दशी विषयी माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही धनत्रयोदशी कथा , धनत्रयोदशीची माहिती , dhantrayodashi information in marathi, dhantrayodashi mahiti in marathi या विषयी निबंध , लेख , कथा लिहण्यासाठी वापरू शकता.

धनत्रयोदशी कथा । धनत्रयोदशीची माहिती | dhantrayodashi information in marathi

इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याचवेळी समुद्रातुन धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते.
म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. त्यादिवशी त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लग्न गीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत स्पर्धा सर्प स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजेच यमलोकात परत जातो.

अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. यामुळे अपमृत्यु टळतो असा समज आहे.

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला धनत्रयोदशी कथा , धनत्रयोदशीची माहिती , dhantrayodashi information in marathi, dhantrayodashi mahiti in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “धनत्रयोदशी कथा । धनत्रयोदशीची माहिती | dhantrayodashi information in marathi”

Leave a Comment