आनंद दिघे यांचा इतिहास | Anand dighe history in Marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला या लेखामधून आनंद दिघेंविषयी माहिती मिळेल , तसेच त्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळेल.  धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्या आयुष्यावर निगडित आहे. आनंद दिघे हे ठाण्याचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जातात. 

आनंद दिघे यांचा इतिहास | Anand dighe history in Marathi

आनंद दिघे कोण होते ( who was Anand dighe )

१९५२ मध्ये आनंद दिघे यांचा जन्म झाला. ते ठाणामध्येच लहानाचे मोठे झाले , टेम्भीनाका परिसरात त्यांचे घर सुद्धा आहे . साधारण ७० च्या दशकात बाळासाहेबांचे भाषणे जोरदार चालायची , त्यांच्या भाषणाला तुफान गर्दी असायची. बाळासाहेबांच्या वक्तृत्वामुळे आनंद दिघे त्यांच्याकडे आकर्षित झाले. काही महिन्यातच ते कट्टर शिवसैनिक झाले आणि त्याच्या कामामुळे त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखाची धुरा सोपवण्यात आली. ते कामामध्ये इतके मग्न झाले कि त्यानीं विवाह सुद्धा केला नाही.

ठाण्यातील टेम्बीनाका परिसरात त्यांनी आनंदाश्रमची स्थापना केली , जेथे ते अनेक गोर-गरिबांचे प्रश्न एका फोन कॉल वर सोडवायचे. आनंद आश्रमात सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावायचे. त्यांना जर योग्य समस्या वाटली तर ते लगेच संबंधित लोकांना फोन करायचे. जर काम करत नसतील किंवा होत नसेल तर त्यांनी काही प्रसंगी आपला धाक ही दाखवला आहे.

आनंद दिघे धर्मवीर कसे झाले ?

आनंद दिघे देवा धर्माच्या बाबतीत सुद्धा आग्रही होते. त्यांनी टेम्भीनाक्यावर जोमाने नवरात्र उत्सव सुरु केला. अनेक लाखो तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्यावर लोंकांचा विश्वास अधिक दृढ झाला होता. म्हणून ठाण्यातील लोकांनी त्यांना धर्मवीर आनंद दिघे असे संबोधित करायला लागले.

त्यांना मानणारा ठाण्यातील जनसमुदाय खूप मोठा होता , म्हणूनच बाळासाहेब काहीकाळासाठी त्यावेळेस अस्वस्थ झाले होते. अशी तेव्हा ठाण्यामध्ये चर्चा होती.

१९८९ च्या दरम्यान जेव्हा ठाणे महानगरपालीची निवडणूक झाली, तेव्हा शिवसेनेचा महापौर येणार असे सगळ्यांना वाटत होते. पण एका मताने शिवसेनेचा पराभव झाला. नंतर कालांतराने समजले की , एक शिवसेनेचं नगरसेवक फुटला होता, त्यांचे नाव होते श्रीधर खोपकर. काही दिवसात खोपकाराचा
मृतदेह हाथी लागला. त्यानंतर टाडा या कायद्याअन्तर्गत आनंद दिघे यांना अटक झाली होती. त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली , पण त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले होते. नंतर त्यांच्या मृत्युपर्यंत ही केस चालूच होती, त्यांचा नाव त्या केसमध्ये आले होते आणि सगळीकडे चर्चा सुरु झाली होती.

नगरसेवक कोणतेही काम करण्यासाठी ४१% टक्क्यापर्यंत कमिशन घेतात, अशी त्यांनी टीका सुद्धा केली होती. त्यांच्या मृत्यापश्चात यातील काही गोष्टी खऱ्या ठरल्या, पण नंतर ह्या विषयी कोणीही चर्चा करण्यास तयार नव्हते.

आनंद दिघे आणि सिंघानिया हॉस्पिटल

ऐन गणेशउत्सव काळात २४ ऑगस्ट २००१ रोजी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांना ठाणे येथील सिंघानिया इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते पण दोनच दिवसात त्यांना लागोपाठ हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी सिंघानिया हॉस्पिटल मध्ये तोडफोड करायला सुरुवात केली आणि ते १५०-२०० खाटांचे ते इस्पितळ जाळून टाकले , कारण त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता.

आनंद दिघे यांचा धर्मवीर चित्रपट (dharmaveer marathi movie)

१३ मे २०२२ रोजी धर्मवीर नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.

Leave a Comment