विजेची बचत काळाची गरज निबंध | save electricity essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये विजेची बचत काळाची गरज निबंध , save electricity essay in marathi , विजेचे महत्व याच्यावर मराठी निबंध, विजेची बचत प्रकल्प माहिती  या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता

विजेची बचत काळाची गरज निबंध | save electricity essay in marathi

वीज काळाची गरज

वीज हा मानवाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये विजेचा जास्तीत जास्त करून वापर करतो. आपल्याला निसर्गाकडून वीज मिळत नाही ती आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणूनच वीज ही पारंपारिक ऊर्जा स्तोत्र मध्ये मोडते.

आजसुद्धा आपल्या देशातील अनेक खेडेगावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. विजेचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे. त्याचप्रमाणे विजेचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. जर आपण विजेचा योग्य प्रमाणात वापर केला तर आपल्या विजेचे बिल कमी येईल त्यामुळे पैशाची बचत होईल.

वीज म्हणजे काय

वीज म्हणजे एक ऊर्जा. जी आपण कोणतीही काम करण्यासाठी वापरतो.

जी वीज आपण कोळसा , पाणी या पासून बनवतो त्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. ही पारंपारिक ऊर्जा आपल्याला मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. कारण हे ऊर्जेचे स्तोत्र कधी ना कधी संपणारे आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रावर अवलंबून राहिला पाहिजे. पावसाळ्यामध्ये जेव्हा ढगांचा मोठा गडगडाट होतो, आणि आकाशात मोठा प्रकाश निर्माण होतो तेव्हा वीज चमकते. या विजेची तीव्रता दश लक्ष मेगा वॉट म्हणजेच सध्या आपण
घरगुती वीज वापरतो तिच्या १०-१५ पट्टीने असते.

आपण जर कुटुंबातील सर्वजण बाहेर जाणार असाल तर विजेचा मुख्य स्विच बंद केलेला असेल याची खात्री करून घ्यावी. आपल्या घराबाहेरील दिवसाउजेडी लागणाऱ्या दिव्यांवर नियंत्रण ठेवावे.

विजेचा वापर आपण कमी करून जास्तीत जास्त आपण पर्यावरण पूरक गोष्टींचे अवलंबन केले पाहिजे. म्हणजेच आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर केला पाहिजे.

ज्या उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते जसे की गिझर, इस्त्री, कपडे धुण्याचे मशीन (वॉशिंग मशीन) त्यांचा योग्य तितकाच आणि मऱ्यादेपूर्तच वापर केला पाहिजे.

आपण सण साजरे करताना विद्युत विजेचा माळेची झगमगाट न करता निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी जसे की फुले, पाने यांचा सुभोभिकरणासाठी जास्तीत जास्त वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी एखादा जर्ज विजेचा दिवा किंवा वीज विनाकारण वापरली जात असेल तर ते बंद करण्यास मदत करावी. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा.

जर आपण वीज योग्य प्रमाणात वापरली तर तर ती सर्व खेडे गावांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. म्हणूनच खेडे गावात उद्भवणारी लोड शेडिंग ची समस्या सुटेल आणि सर्वांना सारख्याच प्रमाणात विजेचा पुरवठा होईल. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा आणि पाणी यांपासून वीज बनवली जाते. स्वीडन सारखा देश ९०% वीज ही कचऱ्या पासून बनवतो. त्यासाठी ते इतर देशामधून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची आयात करतात. 

आपण जर वीज योग्य प्रमाणात वापरली तर आपल्या देशातील कोणतेही खेडेगाव त्यापासून वंचित राहणार नाही. त्यांनाही विजेवर चालणाऱ्या सर्व सुखसोयींचा व सुविधांचा फायदा घेता येईल त्यामुळे आपल्या देशाबरोबर त्या खेडेगावाची सुद्धा प्रगती होईल.

सध्याच्या आधुनिक युगात अनेक अद्ययावत प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत ज्या कमी प्रमाणात वीज वापरून विजेची बचत करतात. अशा प्रकारच्या उपकरणांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, एलइडी बल्ब , सि.फ.ल. (CFL ) 

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला विजेची बचत काळाची गरज निबंध , save electricity essay in marathi , विजेचे महत्व याच्यावर मराठी निबंध, विजेची बचत प्रकल्प माहिती  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment