सचिन तेंडुलकर माहिती मराठी | sachin tendulkar information in marathi

सचिन तेंडुलकर माहिती मराठी | sachin tendulkar information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही सचिन तेंडुलकर माहिती मराठी , sachin tendulkar information in marathi , sachin tendulkar biography in marathi , sachin tendulkar marathi mahiti याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी निर्मल नर्सिंग होम दादर येथे महाराष्ट्रीयन राजापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर नावाजलेले कादंबरीकार आणि कवि होते आणि त्यांची आई रजनी एका खाजगी विमा कंपनीमध्ये कामाला होती. सचिनच्या खोडकर आणि गुंडगिरी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रमेश तेंडुलकर यांनी १९८४ मध्ये रमाकांत आचरेकर यांच्याबरोबर ओळख करून दिली.

सुरुवातीचे क्रिकेट

रमाकांत आचरेकर हे शिवाजी पार्क ,दादर येथे एक प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ओळखले जात होते. आचारेकर यांना सचिन चे क्रिकेट कौशल्य आवडले म्हणून त्यांनी सचिनला शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सांगितले. कारण या शाळेची क्रिकेटची टीम चांगली होती. १४ नोव्हेंबर १९८७ रोजी सचिन ची निवड रणजी ट्रॉफी मध्ये मुंबई संघाकडून खेळण्यासाठी झाली. त्यानंतर एका वर्षांनी ११ डिसेंबर १९८८ रोजी गुजरात संघाविरुद्ध सचिनने आपले पहिले शतक नाबाद राहून झळकावले. त्यामुळे सचिन पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा भारतीय तरुण म्हणून नावारूपास आला.

दिलीप वेंगसरकर यांनी सचिनला कपिल देव यांच्या चेंडू वर चांगल्या प्रकारे खेळताना पाहिले. त्यांना सचिनचा काय आवडला म्हणून त्यांनी सचिनला आपल्या संघात घेण्याचा निर्णय घेतला. सचिनने १९८८ ते १९८९ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणून नाव मिळवले. सचिन हा असा खेळाडू आहे ज्यांनी आपल्या पदार्पणामध्ये रणजी, इराणी आणि डुलीप ट्रॉफी या स्पर्धेमध्ये शतक झळकावले.

१९८९ मध्ये राजसिंग डोंगरापुर यांनी पाकिस्तान येथे होणाऱ्या भारताच्या स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरला निवडले. वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १९८९ मध्ये सचिन पाकिस्तान मधील कराची येथे पाकिस्तान संघाविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. त्या स्पर्धेमध्ये सचिनने १५ धावा बनवल्या. सियालकोट येथे खेळलेल्या शेवटच्या सामन्यांमध्ये सचिनच्या नाकाला एक उसळता चेंडू लागला आणि दुखापत झाली.

कसोटी कारकीर्द

१९९२ क्रिकेट विश्वचषका अगोदर १९९१-९२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान सिडनी येथील तिसऱ्या कसोटीत सचिनने नाबाद राहून १४८ धावा केल्या होत्या. अश्या प्रकारे सचिनने स्वतःचा खेळ आणि प्रतिष्ठा आणखी वाढवली.

त्यानंतर पर्थ येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यांमध्ये सचिनने उसळत्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघाच्या ह्यूजेस, ब्रूस रीड आणि क्रेग मॅकडर्मॉट अश्या गोलंदाजांविरुद्ध वेगवान ११४ धावा केल्या.

सचिनने ९ सप्टेंबर १९९४ रोजी पहिले एकदिवसीय शतक श्रीलंकेमधील कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले. त्याने ७८ एकदिवसीय सामन्यांनंतर आपले पहिले शतक झळकावले.

१९९६ च्या विश्वचषकात सचिनने दोन शतके झळकावून जास्तीत जास्त धावा मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कायम राखले. १९९८ च्या सुरुवातीला भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सचिनने सलग तीन शतके करत संघाला चांगल्या धावा जोडण्यास मदत केली.

या ऑस्ट्रेलियन दौऱ्या मध्ये सचिन आणि शेन वॉर्न मध्ये चांगला संघर्ष पाहण्यास मिळाला. सचिन आणि शेन वॉर्न दोघेही आपल्या यशाच्या शिखरावर होते. त्या कसोटी मालिकेत मधील एका डावांमध्ये सचिनने नाबाद २०४ धावा केल्या होत्या तर शेन वॉर्नने १६ षटकांत १११ धावा दिल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांतच सामना गमावला होता.

१९९९ च्या मध्यंतरी विश्वचषक सुरु असतानाच सचिनच्या वडिलांचे निधन झाले. सचिन अंतिम विधीसाठी भारतात परतला. पण , तरीही विश्वचषकामधील पुढील सामन्यासाठी तो परत उपस्तिथ राहिला. ब्रिस्टल येथे केनियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये सचिनने १०१ चेंडूत नाबाद १४० धावा पटकावल्या. अशाप्रकारे ते शतक सचिन आपल्या वडिलांना समर्पित केले.

२००१ ते २००२ मध्ये सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केली. तसेच २००३ मध्ये ११ सामन्यात ६७३ धावा केल्या होत्या आणि विश्वचषकामधे भारताला अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यात मदत केली होती. पण अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि विश्वचषक मिळवला. त्या विश्वचषकामधे सचिनला उत्कृस्ट सामनावीर पुरस्कार जाहीर झाला होता.

एकदिवसीय कारकीर्द

२००३-०४ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा सचिनने आपला उत्तम खेळ दाखवला. सिडनी येथील मालिकेतील शेवटच्या कसोटीत ४३६ चेंडूत नाबाद २४१ धावा केल्या. भारताला अक्षरशः अजिक्य स्थितीत आणले आहे. तेव्हा भारताने पहिल्या डावात ७०५/७ धावा केल्या होत्या.

सचिनने मुलतान येथे पाकिस्तानविरुद्ध नाबाद १९४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर टेनिस एल्बोच्या दुखापतीमुळे वर्षभर अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. २००४ मध्ये या दुखापती अगोदर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अखेरचे दोन सामने सचिन खेळाला होता.

१० डिसेंबर २००५ रोजी फिरोजशाह कोटला येथे, सचिनने श्रीलंका संघाविरुद्ध विक्रमी ३५ वे कसोटी शतक झळकावले. सचिनने ६ फेब्रुवारी २००६ रोजी मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचे 39 वे एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २००८ रोजी पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ४२ धावा केल्या

मलेशियातील डीएलएफ कपमध्ये सचिनचे पुनरागमन झाले आणि चांगला खेळ दाखवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज होता. त्याने नाबाद १४१ धावा केल्या, पाऊस पडल्यामुळे वेस्ट इंडिज संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले.

सन्मान आणि पुरस्कार

भारतीय पुरस्कार

सचिनला १९९४ मध्ये भारत सरकार कडून अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
१९९७-९८ मध्ये खेळामध्ये अतिउच्च असा खेळ रत्न पुरस्कार सचिनला मिळाला.
१९९९ मध्ये सचिनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२००१ मध्ये सचिनला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
२००८ मध्ये सचिनला पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
२०१४ मध्ये सचिनला भारतातील सर्वोच पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियन पुरस्कार

ऑस्ट्रेलियन सरकारने दिलेला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती मराठी , sachin tendulkar information in marathi , sachin tendulkar biography in marathi , sachin tendulkar marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment