मी पक्षी झालो तर निबंध | mi pakshi zalo tar nibandh

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मी पक्षी झालो तर निबंध बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही मी पक्षी झालो तर निबंध , mi pakshi zalo tar nibandh याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

मी पक्षी झालो तर निबंध | mi pakshi zalo tar nibandh

जेव्हा मी मित्रांसोबत अंगणामध्ये खेळत होतो, तेव्हा मला खूप उंचीवरून पक्ष्यांचा थवा जाताना दिसला.

तेव्हा माझ्या मनात विचार आला कि , मी पक्षी झालो तर…

केव्हाही गगन भरारी घेण्याचे सामर्थ्य फक्त पक्षांमध्येच आहे. मनुष्य हा फक्त विमानामध्ये किंवा कोणत्याही उडणाऱ्या वाहनांमध्ये प्रवास करून उडण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.

देवाने पक्षांप्रमाणे मनुष्याला उडण्यासाठी पंख दिले नाहीत. त्यामुळे कोणताही मनुष्य उडू शकत नाही. अन्नसाखळी मधील प्रत्येक प्राणी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे पक्षी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मी पक्षी झालो तर इतर पक्षाप्रमाणे उंचच उंच भरारी घेऊ शकेन. आपल्या विमानाची रचना पक्ष्यांच्या उडण्यावरूनच झाली आहे. पक्ष्याचे पंख आणि त्यामधील हाडे ही पोकळ असतात. म्हणून पक्षी सहजपणे उडू शकतात.

मी पक्षी झालो तर सूर्योदयापासून सूर्यास्त स्वतःच्या डोळ्याने झाडावर बसून पाहीन. उंचच उंच झाडावर छान असे स्वतःचे घरटे बांधीन. त्या घरट्यामध्ये आपल्या पिल्लांना जन्म देईन. आपल्या पिल्लांचा अतिशय सुखरूपणे सांभाळ करेन. त्यांना जगायला आणि स्वतःच्या पंखांनी उडायला शिकवेन.

मी पक्षी झालो तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर विमुक्तपणे संचार करेन. आपल्या सर्व पक्ष्याबरोबर थव्या प्रमाणे प्रवास करेन. मी पक्षी झालो तर माझ्या मंजुळ आवाजाने सकाळी सर्वांना जागे करेन.

जंगलातील मधील मेलेले किडे-मुंग्या खाहुन निसर्गाचा समतोल राखेल. झाडावर बसून गोड , मधुर आणि ताज्या फळांचा आस्वाद घेईन. मी पक्षी झालो सर्व पक्षाबरोबर मैत्री करेन. इतर पक्षाबरोबर मी परदेशी प्रवास करेन. मी पक्षी झालो तर या देशांमधून त्या देशामध्ये लाखों मैलांचा प्रवास पासपोर्ट किंवा व्हिसा विना करेन.

असं काहीतरी काम करेल, की मानवाला जंगल संवर्धनासाठी प्रवृत्त करेन. जेणेकरून माझ्या कित्येक पिढ्या मी वाचवू शकेन.

जेव्हा वादळ येते तेव्हा पाहिली चाहूल पक्ष्यांना लागते. त्याप्रमाणे मी पक्षी झालो तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची ( उदारणार्थ भूकंप , वादळ , ढगफुटी ) माहिती मला अगोदर कळेल.

जेव्हा उन्हाळा खूप तीव्र असतो किंवा तापमान ३०-४० डिग्री अंशच्या वरती जाईल, तेव्हा माझे खूप हाल होतील. कडक उन्हामुळे मला चटके बसतील. अनेक पक्षी आणि माझे पाणी न मिळाल्यामुळे तडफडून मरून जातील.

जागतिक तापमानाचा परिणाम इतर प्राण्याप्रमाणे माझ्यावर देखील होईल. मी पक्षी झालो तर , त्यांच्या जीवनातील येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी मला देखील कळतील.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मी पक्षी झालो तर निबंध , mi pakshi zalo tar nibandh हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment