मक्याचा चिवडा रेसिपी | Makyacha Chivda recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण मक्याचा चिवडा रेसिपी ( Makyacha Chivda recipe in marathi) दिली आहे.  मक्याचा चिवडा रेसिपी ( Makyacha Chivda recipe in marathi ) ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.

मक्याचा चिवडा रेसिपी | Makyacha Chivda recipe in marathi

मक्याचा चिवडा रेसिपी साहित्य | Makyacha Chivda recipe ingredients in marathi

 • तेल
 • मक्याचा चिवडा (1 कप)
 • शेंगदाणे (अर्धा कप)
 • कडीपत्ता (10/12 )
 • काजू (10) (पर्यायी)
 • मसाला 1 टीस्पून किंवा मिर्ची (तळलेला)
 • काळे मीठ चिमूटभर
 • चवीनुसार मीठ
 • पावडर साखर 1 टीस्पून (पिटी साखर)

मक्याचा चिवडा रेसिपी कृती | Makyacha Chivda recipe procedure in marathi

 1. एका कढईत तेल घेऊन गरम करा.
 2. तेल गरम झाल्यावर त्यात १ कप मक्याचा चिवडा तळून घ्या. तळलेला मक्याचा चिवडा एका मोठ्या भांड्यात कडून ठेवा.
 3. 5/6 सेकंद अर्धा कप शेंगदाणे तळून घ्या आणि वाडग्यात घाला.
 4. काजू तळून ते काजू वाडग्यात घाला.
 5. कडीपत्ता एका गाळणी मध्ये घालून ते फ्राय करून घ्या.
 6. तळलेले सर्व बाउल मध्ये घालून मिक्स करून घ्या.
 7. त्यानंतर १ टी स्पून मिर्ची पावडर किंवा २ बारीक चिरलेली हिरवी मिरची (तळलेली), चवीनुसार मीठ, काळे मीठ चिमटे आणि १ टी स्पून पिटी साखर वाडग्यात घाला.
 8. वरील मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घ्या.
 9. आपला एकदम खुशखुशीत मक्याचा चिवडा तयार आहे.

टीप: सर्व सुका मसाला गरम मिश्रणात घाला म्हणजे मसाला एकजीव होईल.

धन्यवाद खवय्यांनो. जर आपल्याला मक्याचा चिवडा रेसिपी ( Makyacha Chivda recipe in marathi ) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “मक्याचा चिवडा रेसिपी | Makyacha Chivda recipe in marathi”

Leave a Comment