आरती संग्रह | आरती पुस्तक | aarti sangrah marathi pdf

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये आरती संग्रह | आरती पुस्तक | aarati book | aarti sangrah marathi pdf | aarati pustak या विषयी माहिती दिली आहे. 

आरती संग्रह | आरती पुस्तक aarati book | aarati pustak | aarti sangrah marathi pdf

गणपतीची आरती


॥ सुखकर्ता दुःखहर्ता ||

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||
|| जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ० ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरेजडित मुगुट शोभतो बरा || रुणझुणती नू पुरे चरणी घागरिया ||जय०||

लंबोदर पितांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ 1
दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय० ॥ दर्शन० ||3||

नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे || लाडू मोदक अन्न परिपूरित पात्रें ॥
ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्र || अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे ||1||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती || तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ||जय०||धृ०||

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती || त्यांची सकलही पापे विघ्नेंही हटती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ॥ सर्वही पावुनि अंतीं भवसागर तरती ॥
जय०||2||

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ॥ कीर्ती तयांची राहे जोंवर शशितरणी ॥
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी | गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥ जय०॥ 3||


॥ शेंदुर लाल चढायो ||

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ।दोंदिल लाल बिटाजे सुत गौरीहरको ||
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पदको ||1||
जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ||धृ||

अष्टसिद्धि दासी संकटको बैटरी | विघ्नविनाशन मंगल-मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबी तेरी | गंडस्थलमस्तक झूले शशिबहारी ॥ जय०॥
भावभगतसे कोई शरणागत आवे | संतत संपत सबही भरपूर पावे ||
ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥


॥ तूं सुखकर्ता ॥

तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मीं गणपतिबाप्पा मोरया ||धृ०||
मंगलमूर्ती तूं गणनायक, वक्रतुंड तूं सिद्धीविनायक तुझिया द्वारी आज पातलों, ये देई चित्त मज घ्याया ॥ संकटी०|||||
तूं सकलांचा भाग्य विधाता, तूं विद्येचा स्वामी दाता । ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्याला || संकटी० ||2||
तूं माता तूं पिता जंगी या, ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या । पामर मीं स्वर उणे भासती । तुझी आरती गाया || संकटी० ॥

॥ शंकराची आरती ॥

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझूळां ||||
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओंवाळू तुज कर्पुरगौरा ||धृ||

कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा || जय ||

देवीं दैत्यी सागरमंथन पैं केले त्यामाजी अवचित हालहाल जे उठिले ||
ते त्वां असुरपणे प्राशन केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ||जय०||3||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी||

शतकोटीचे बीज वांचे उच्चारी | रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥ जय०||4||

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ||
वारी वारी जन्मरणांतें वारीं हारी पडलों आतां संकट निवारीं |||||
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ||धृ०||

त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐसी नाहीं चारी श्रमले परंतु न बोलवे काहीं ||
साही विवाद करितां पडलो प्रवाहीं ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाहीं ||जय०||2||

प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासुनि सोडवि तोडी भवपाशा ||
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा || जय०||3||

विठ्ठलाच्या आरात्या

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ||
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आलें गा । चटणी वाहे भीमा उद्धरी जगा ||||
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा पावें जिवलगा ||धृ०||

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसें पीतांबर कस्तुरि लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय०||2||

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळां सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥
टाई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सांवळा ||जय ||3||

ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ||
दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती ||जय०||4||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती ॥

दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥ जय०||5||

येई हो विठ्ठले माझे माउली ये || निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ||धृ||
आलिया गेलिया हातीं धाडीं निरोप || पंढरपुरी आहे माझा मायबाप || येई०|||||

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला || गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला || येई०||2||
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी || विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळिं || येई || ||

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा।
नेति नेति शब्द न ये अनुमाना। सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना || ||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता। आरती ओवाळितां हरली भवचिंता ॥धृ०॥

सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त । अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथे कैंचा हेत । जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय ||2||
दत्त येऊनीयां उभा ठाकला । सद्भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्मरणाचा फेरा चुकविला ||जय०||3||
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान । हरपले मन झालें उन्मन ॥
मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान ॥ जय०||4||

॥ ज्ञानदेवांची आरती ॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा ॥

सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ॥

अवतार पांडुरंग नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती०||

कनकाचे ताट करी उभ्या पिका नारी ॥

नारद तुंबरू हो साम गायन करी ॥ आरती०||2||

प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रम्हाचि केलें ॥

रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले आरती०||3||

॥ तुकारामांची आरती ॥

आरती तुकारामा || स्वामी सद्गुरुधामा ||

सच्चिदानंदमूर्ती ॥ पाय दाखवीं आम्हां ||धृ०||

राघवें सागरांत ॥ पाषाण तारिले || तैसे हे तुकोबाचे ||

अभंग उदकीं रक्षिले ||आरती०|||||

तुकितां तुलनेसी ॥ ब्रम्ह तुकासी आलें ॥

म्हणोनी रामेश्वरें || चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती०||2||

॥ सत्यनारायणाची आरती ||

जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा || पंचारित ओंवाळूं श्रीपति तुज भक्तीभावा ॥ जय०॥०॥
विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण । परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्जुन ॥
घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण || जय ||

शतानंदविप्रें पूर्वी व्रत हैं आचरिले दारिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगिं सकळां श्रुत झालें भावार्थे पूजिता सर्वां इच्छित लाधलें || जय || ||

साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापाने संकटी पडूनी दुःखहि भोगिले। स्मृती होउनि आचरितां व्रत त्या तुवचि उद्धरिलें ॥ जय०||3||

प्रसाद विसरुनि प्रतिभेटीला कलावती गेली । क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिती आली मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिमली || जय || 4||

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणी 1 पतीची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजायासी पुत्र भेटती येऊनि । ऐसा भक्तां संकटीं पावसि तूं चक्रपाणी || जय ||5||

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरति इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती |
संहरती भवदुरितें सर्व बंधने तुटती । राजा टंका समान मानुनि पावसी श्रीपती ॥ जय०||6||

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा । भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ॥
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सवेंशा | मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय०|| 7 ||

॥ साईबाबांची आरती ॥

आरती साईबाबा सौख्यदातार जीवा । चरणजातळीं । द्यावा दासां विसावा, भक्तां विसावा ॥धृ॥
जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहे दंग | मुमुक्षुजनां दावी निज डोळां श्रीरंग डोळा श्रीरंग || आरती साईबाबा |||||

जया मनी जैसा भाव ॥ तया तैसा अनुभव दाविसी दयाघना। ऐसी तुझी ही माव || आरती साईबाबा || 2 ||
तुमचें नाम ध्याता हरे संमृतिव्यस्था अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा ।। दाविसी अनाथा || आरती साईबाबा || 3 ||

कलियुगी अवतार। सगुणब्रह्म साचार अवतीर्ण झालासे ॥ स्वामी दत्त दिगंबर || दत्त दिगंबर || आरती साईबाबा ||4||
आठां दिवसां गुरुवारी । भक्त करिती वारी। प्रभुपद पहावया। भवभय नीवारी ॥ आरती साईबाबा ||5||

माझा निज द्रव्य ठेवा । तव चरण रजसेवा | मागणें हेंचि आतां ॥ तुम्हां देवाधिदेवा || देवाधिदेवा || आरती साईबाबा ||6||

इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख। पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक || आपुली भाक ||
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा । चरणजातळीं । द्यावा दांसा विसावा, भक्तां विसावा ॥7॥

॥ श्रीकृष्णाची आरती ॥

ओंवाळूं आरती मदनगोपाळा || श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ||धृ०||
चरणकमल ज्याचे अति सुकुमार || ध्वजवज्रांकुश ब्रीदांचे तोडर ||1||

नाभिकमल ज्याचे ब्रह्मयाचें स्थान || हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांच्छन ||2||
मुखकमल पाहता सूर्याच्या कोटी || मोहियलें मानस कोदियेली दृष्टी ||३||

जडित मुगुट ज्याचा देदीप्यमान | तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन || 4 ||
एका जनार्दनीं देखियेलें रूप || रूप पाहों जातां झालें तद्रूप ||5||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥ श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥

॥ निरोपपर गीत ॥

जाहलें भजन आम्ही नामितों तव चरणां ॥ वारूनियां विघ्नें देवा रक्षावें दीना ||धृ०॥
दास तुझे आम्ही देवा तुलाचि ध्यातों ॥ प्रेमेंकरूनी देवा गूण तुझे गीतों ||||

तरी न्यावी सिद्धि देवा हेचि वासना ॥ रक्षुनीयां सर्वा द्यावी आम्हांसी आज्ञा ||2||
मागणें तें देवा आतां एकचि आहे ॥ तारुनियां सकळां आम्हा कृपादृष्टीं पाहें ॥3॥

जेव्हां आम्ही मिळू ऐशा या ठाया || प्रमानंदें लागूं तुझी कीर्ती वर्णाया ||4||
सदा ऐसी भक्ती राहो आमुच्या मनीं ॥ हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ||5||

निर्दाळूनी अरिष्टें आतां आमुचीं साीं ॥ कृपेची साउली देवा दीनांवरी कीं ||6||
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी || आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्हीं रक्षावी || 7 ||

॥ श्रीगणपतीस्तोत्र ॥

श्रीगणेशाय नमः
नारद उवाच । प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥ भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयु:कामार्थ सिद्धये |||||
प्रथमं वक्रतुंड च एकदंतं व्दितीयकम् ॥ तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ||2||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥ सप्तमं विघ्नराजेद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||३||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ॥ एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||4||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ॥ न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो ||5||
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ॥ पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिम् ||6||

जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासः फलं लभते ॥ संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ||7||
अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ॥ तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||8||

॥ इति श्रीनारादपुराणे संकष्टनाशन गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥

॥ श्रीगणपतीस्तोत्र ॥

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीनें स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||||
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत तें। तिसरें कृष्णपिंगाक्ष चवथें गजवक्त्र तें ||2||

पांचवें श्रीलंबोदर सहावें विकट नांव तें । सातवें विघ्नराजेंद्र आठवें धूम्रवर्ण तें ॥3॥
नववें श्री भालचंद्र दहावें श्रीविनायक । अकरावें गणपति बारावें श्रीगजानन ||4||

देवनावें अशीं बारा तीन सध्या म्हणे नर । विघ्नभीति नसे त्याला प्रभो । तूं सर्वसिद्धीद ||5||
विद्यार्थ्याला मिळे विद्या । धनार्थ्याला मिळे धन । पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ||6||

जपतां गणपतिस्तोत्र सहा मासांत हें फळ । एक वर्ष पूर्ण होतां मिळे सिद्धि न संशय ||7||
नारदांनी रचिलेलें झालें संपूर्ण स्तोत्र हैं। श्रीधरानें मराठीत अनुवादिलें ||8||

॥ अभंग ॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ॥ | प्रेमें आलिंगन, आनंदें पूजिन। भावें ओवाळिन म्हणे नामा ||
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्व सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ||2||

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात् कटोमि यद्यत् सकलंपरस्मै, नारायणायेति समर्पयामी ||3||
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे ॥

हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला आरती संग्रह | आरती पुस्तक | aarati book | aarti sangrah marathi pdf | aarati pustak हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment