नरक चतुर्दशी माहिती मराठी | narak chaturdashi information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये नरक चतुर्दशी विषयी माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही नरक चतुर्दशी माहिती मराठी ( narak chaturdashi mahiti ), नरक चतुर्दशी माहिती मराठीमध्ये (narak chaturdashi information in marathi ) , नरक चतुर्दशीची कथा ( narak chaturdashi story ) या विषयी निबंध , लेख , कथा लिहण्यासाठी वापरू शकता.

नरक चतुर्दशी माहिती मराठी  | narak chaturdashi information in marathi

पुराणानुसार नरकासुर हा एक प्रसिद्ध असुर होता, ज्याला पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न विष्णुपुत्र म्हणून ओळखल्या जायचे. हा वराह अवतार वेळी जन्मला होता, जेव्हा विष्णूने पृथ्वीचा उद्धार केला होता.

जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला, नरकासुराचा जन्म त्याचं स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजेच सीतेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर १६ वर्षांचा होत पर्यंत त्याच पालन पोषण केलं. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेच्या राजा कंस याचा असुर मित्र होता.

विदर्भाची राजकुमारी माया हिच्याची त्याचा विवाह झाला, त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्भेथ रथ दिला.
काही दिवसांपर्यंत तर नरकासुर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता. पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दृष्ट झाला.

त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला.या आपापासून वाचण्याकरिता एकदा नरकासुराने कठोर तप कस्त ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व अवध्यत्वा’चा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला.

त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बैदी बनवून ठेवले.

नरक चतुर्दशी माहिती मराठी ( narak chaturdashi mahiti ), नरक चतुर्दशी माहिती मराठीमध्ये (narak chaturdashi information in marathi ) , नरक चतुर्दशीची कथा ( narak chaturdashi story )
narak chaturdashi information in marathi

त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्र वेखील बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना त्रासदायक झाला होता. श्रीकृष्णाला हे कळताच श्रीकृष्ण गरुडावर बसून सत्यभामे बरोबर नरकासुराच्या प्राग्ज्योतिष नगरात गेला.

प्राम्ज्योतिष नगरीत बळकट किल्ले, शस्त्रास्त्रांचे कोट पाण्याने, अग्नीने आणि वायूने भरलेले खंदक असा कडेकोट बंदोबस्त होता, या शिवाय अगोदर मूर राक्षसाच्या भयंकर बळकट बंदोबस्ताचा पाश सभोवार होता.

श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या साहाय्याने पर्वताचे पीठ केले. बाणांच्या साहाय्याने शस्त्रास्त्रांचे कोट मोडून टाकले. सुदर्शन चक्राच्या सहाय्याने अग्नी, पाणी, विषारी वायू यांचे खंदक भेदुन टाकले आणि प्रथम तलवारीने मूर राक्षसाला ठार मारले. त्याचा पांचजन्य शंख वाजविला.

त्यानंतर त्याने नरकासुराच्या नगरीत प्रवेश केला. प्रथम श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैनिकांना छिन्नविच्छित्र केले. गरुडानेसुद्धा आपल्या पैखाने, चोचीने सैनिकांना व्याकूळ करून त्यांना जखमी केले.

नरकासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला आणि त्याचे मस्तक उडविले. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांची कुटुंबे आता स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने त्या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

अस म्हणतात की, नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते, हेच रक्‍त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने मनान केले होते. तेव्हापासूनचं त्यादिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरु झाली.

 धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला नरक चतुर्दशी माहिती मराठी ( narak chaturdashi mahiti ), नरक चतुर्दशी माहिती मराठीमध्ये (narak chaturdashi information in marathi ) , नरक चतुर्दशीची कथा ( narak chaturdashi story ) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.   

1 thought on “नरक चतुर्दशी माहिती मराठी | narak chaturdashi information in marathi”

Leave a Comment