वेळेचे महत्व मराठी निबंध | veleche mahatva essay in marathi

वेळेचे महत्व मराठी निबंध , veleche mahatva essay in marathi

वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाही तो निरंतर चालत राहतो म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते. हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.

तुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात न वेळ ही संपत्ती आहे. जर आपण उशिराने परीक्षा केंद्रावर उशिरा पोहाचलो तर कदाचित आपल्याला आतमध्ये घेणार नाहीत किंवा आपला पेपर अपूर्ण राहून आपण नापास होण्याची सुद्धा शक्यता असते.

गेलेले पैसे परत मिळवता येतात, न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेळेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही, आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी अनुसार हि चालत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर तुम्हाला कष्टाचे योग्य फळ मिळणारच. जर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचलो तर कदाचित आपली गैरहजेरी लागू शकते किंवा आपल्या सुट्ट्यांमध्ये वजावट होऊ शकते. काही कंपन्या / कार्यालयामध्ये उशीरा पोहोचल्यामुळे दंड सुद्धा आकारतात.

वेळेचे महत्व मराठी निबंध , veleche mahatva essay in marathi , veleche mahatva essay in marathi language , essay on veleche mahatva in marathi, वेळेचा सदुपयोग essay, वेळेचा सदुपयोग essay, important of time essay in marathi, veleche niyojan in marathi

हे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जाणतात म्हणूनच तर आपली शाळा वेळे अनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्यांना चांगले गुण मिळतात. शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणा साठी हि क्षणभर हि थांबत नाही वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली.

वेळेचे आपल्या आयुष्या मध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. आज जेजे जगात थोर लोक आहेत ते सर्वच वेळेचे पालन करतात आणि आपली कामे वेळेवरच करतात. ह्या एक सवय मुळेच ते इतके यशसस्वी झाले आहेत.

आपण आज पासून नाही तर याच क्षणापासूनच वेळेचे पालन करने सुरु केले पाहिजे. आपल्या सर्व कामाचे वेळापत्रक तयार करून ते नियोजीत पणाने पूर्ण केली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनाचे सार्थक करू. अपयशी माणूस नेहमी आपला वेळ फालतू गोष्टी मधे वाया घालवतो, म्हणून त्याला कधीच यश मिळत नाही.

जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर आपण रेल्वेचे घेऊ शकतो. समजा तुम्ही गावी जायला निघालात आणि बस स्थानकात तुम्ही फक्त पाच मिनिटे उशिरा पोचलात. तर तुमच्यासाठी ती बस सुद्धा थांबणार नाही ती निघून जाईल. गोष्टी वेळेवर झाल्या तर त्यापासून होणारे परिणाम उद्भवत नाहीत. नाहीतर आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल.

वेळेचा सदुपयोग

यशस्वी माणसे वेळेला नेहमीच महत्व देतात. सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या ठरवतात. त्यांचे रोजच्या कामाचे वेळापत्रक अगोदरच ठरलेले असते. ज्यामध्ये प्रत्येक कामासाठी एक ठराविक वेळ ठरलेली असते. या वेळापत्रकाचे ते कठोरपणे पालन करतात. त्यांच्याप्रमाणेच आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपल्याला आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सध्या करायच्या आहेत, त्याचा प्राधान्य ठरवून योग्य ते नियोजन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टी ची वेळ ठरवली पाहिजे . जो वेळेचा सदुपयोग करतो त्यालाच वेळेचे महत्व पटते आणि तोच मनुष्य आयुष्यामध्ये यशस्वी होतो.

जर तुम्ही कुठल्याही बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून कर्ज घेतले असेल. हे कर्ज जर तुम्ही वेळे मध्ये परत केले नाही तर तुमचे व्याज कित्येक पटीने वाढू शकते. याला महत्त्व न दिल्याने अशाप्रकारे आपलेच नुकसान होते. आपण जर समजा चित्रपटगृहांमध्ये उशिरा पोहोचलो तर तो भाग आपल्यासाठी खास दाखवण्यात येणार नाही.

वेळेचे महत्व

रस्त्यावर समजा एखादा अपघात घडला आणि त्या या माणसाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत किंवा वेळेवर इस्पितळांमध्ये दाखल केले नाही तर त्याचा होऊ शकतो.
अलीकडच्या काळात वेळेवर न मिळाल्यामुळे किंवा वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमावले आहेत.

एका वर्षाचे महत्व
जर तुम्हाला एका वर्षाचे महत्व समजायचे असेल, तर परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे वर्ष वाया गेलेल्या विद्यार्थ्यांला विचारा.

एका महिन्याचे महत्व
जर तुम्हाला एका महिन्याचे महत्त्व समजायचे असेल, नऊ महिन्यांच्या अगोदर जन्मलेल्या बाळाच्या आईला विचारा.

एका तासाचे महत्व
जर तुम्हाला एका तासाचे महत्व समजायचे असेल, तर लेखकाला किंवा कवींना विचारा.

एका मिनिटाचे महत्व
जर तुम्हाला एका मिनिटाचा महत्व समजायचे असेल तर ज्याची आत्ताच बस किंवा ट्रेन चुकली आहे त्याला विचारा.

एका सेकंदाचे महत्व
जर तुम्हाला एका सेकंदाचे महत्व समजायचं असेल तर , ज्याचा अपघातांमध्ये जीव बचावला आहे त्याला विचारा.

एका मिली सेकंदाचे महत्व
जर तुम्हाला एका मिली सेकंदाचे महत्व समजायचे असेल तर ऑलम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या विजेत्याला विचारला.

आपल्या आयुष्यात देखील अनेक गोष्टी वेळेवर घडल्या तर आपले आयुष्य सुखदायी व समाधानी होते. जसे की वेळेवर लग्न , योग्य वेळी पालकत्व, योग्य वेळेवर वृद्धापकाळ हा झालाच पाहिजे.
म्हणून आता पासून आपण वेळेचे योग्य पालन करूया आणि यशाचे हे शिखर गाठूया.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला वेळेचे महत्व मराठी निबंध , veleche mahatva essay in marathi , veleche mahatva essay in marathi language , essay on veleche mahatva in marathi, वेळेचा सदुपयोग essay, वेळेचा सदुपयोग essay, important of time essay in marathi, veleche niyojan in marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment